• Sat. Sep 21st, 2024

शिंदे गटासह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र, म्हणाले- दुसऱ्यांना दुःख देण्याचा आनंद काही विकृतांना…

शिंदे गटासह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र, म्हणाले- दुसऱ्यांना दुःख देण्याचा आनंद काही विकृतांना…

मुंबई: ठाकरे गटाने शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मेळावा आयोजित केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आज आपल्या शिवसेनेला ५७ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही जोश ताकत आपल्यामध्ये अजूनही आहे. शिवसैनिकांची अफाट गर्दीने हॉल भरलेला आहे. गर्दी शब्दाचा अर्थ असा की पेशवे काळात लढाई करताना गोंधळ घालण्यासाठी वसूली करण्यासाठी ठेवलेली टोळी. तसेच शिवसैनिकांना हसवण्यासाठी हास्यजत्रेचे कलाकार आले त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
राज्यात मंत्री, दिल्लीत वजन पण कारखान्याची सत्ता राखण्यात अपयश, भाजप नेत्याला हाताशी धरुन थोरातांनी गेम केला!
ठाकरे म्हणाले की, दुसऱ्यांना दुःख देण्याचा आनंद काही विकृतांना असतो. मणिपुरीमध्ये जा असे मी बोललो तर मला बोलतात की सूर्यावर थुंकू नका. जर मग हे सूर्य आहेत तर माणिपूरमध्ये हे का उगवत नाहीत…? सीरिया आणि लिबियासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी माहिती आपले लेफ्टनंट जनरल निशिकांत यांनी दिली. सीरियाचा हुकुमशहाची शेवटी काय परिस्थिती झाली सर्वांना माहीत आहे. त्यांना शेवटी गटारामध्ये लपून बसायची वेळ आली. तिथे भाजपवाले असले तरीही मारले जाऊ नये हे आमचं हिंदुत्व आहे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. कोविडची लस मोदीजींनी शोधून काढली, मग बाकीचे संशोधक गवत उपटत बसले होते का ? मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिंग द्यायची सध्या गरज आहे. मानसिक रुग्णांना समीर चौगुले यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे सगळे अवली आहेत. लवली इथे कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता तापली आहे, असा खोचक टोला यावेळी ठाकरेंनी लगावला.
शिंदेंची गारद्यांची टोळी, फडणवीसांच्या डोक्यात व्हायरस गेला, उद्धव ठाकरे बरसले
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत होती तेव्हा इस्लाम खतरे मे है, असे बोलायचे आता भाजपवाले सत्तेत आहेत तर हिंदू खतरे मे है असे बोलतात याचा अर्थ काय? तुम्ही सत्ता चालवायला नालायक ठरला आहात. हिंदू आक्रोश करत आहेत. काश्मीरमध्ये अजूनही हिंदू मारले जात आहेत. देशाचे शत्रू संपवा तर तुम्ही राजकारणामध्ये शत्रू संपवत निघालेले आहात. लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंग यांनी तिथली परिस्थिती ट्विटरवर ट्विट केलेली आहे.

शिंदे गटावर निशाणा साधत ते म्हणाले की, कोर्टाचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे यांना ट्रॅव्हल्स कंपनी काढायला सोपे जाईल गुजरातला गेल्यावर कुठे रहायचे ? गुवाहाटीला कुठे रहायचे ? दिल्लीत गेल्यावर मुजरा कसा करायचा ? हा सर्व अनुभव गाठीशी आलेला आहे. इतका अनुभव आलेला आहे की, त्याच्या गाठी झालेल्या आहेत. गुजरात गाठीशेव खात आहे. रक्त सांडून घाम गाळून शिवसैनिकांनी तुम्हाला उभं केल होतं. आयत्या बिळावर तुम्ही नागोबा झालेले आहात. भाजपवाले तुम्हाला दूध पाजतील, पुंगी वाजवतील, टोपलीत घालतील आणि देतील सोडून, अशी तीव्र शब्दात त्यांनी टीका केली.

मोदींनी कोविड लस तयार केली, हे सगळे अंधभक्त; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

हे आल्यापासून पाऊस सुद्धा लांबला आहे. परंतु पाऊस पडू दे बळीराजाला त्याच फळ मिळू दे. हे सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर जेवढा खर्च झालेला आहे, तेवढा खर्च शेतकऱ्यांना दिला असता तरी आपल्या बळीराजाचं संकट दूर झालं असत. मी कधी हिम्मत हरलो नाहीच आणि हरणार पण नाही. मला नेहमी असं वाटतं की शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघत आहेत, आपली परीक्षा घेत आहेत. अतिरेक्यांचे संकट असो की धमक्या असो हे सर्व मी सोसलं आणि ही सर्व फौज उभी केली. जिकडे आव्हान आहे तिथे शिवसेना, जिथे शिवसेना आहे तिथे आव्हान हे असंलच पाहिजे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, नोकिया मोबाईलमधल्या सापाच्या खेळाप्रमाणे आपल्याला आव्हान पेलत जायचं आहे. परंतु हे आव्हान आपल्याला संपवायचे आहे. हे शेवटचं असणार आहे, आपल्याला हा शत्रू संपवायचा आहे. उद्या एक वर्ष पूर्ण होईल गद्दारपणाला, कारण उद्या गद्दार दिन आहे. राम मंदिर बांधलेले असताना देखील आजही त्यांना उद्धव ठाकरे यांचा जप करावा लागत आहे. उद्धव ठाकरे हा एकटा नाही हा समोर बसलेला सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे आहे. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोरू शकता, परंतु मनातले बाळासाहेब तुम्ही चोरू शकणार नाही.

प्रसाद खांडेकरचं उद्धव ठाकरेंसमोर सादरीकरण, आभार मानताना काढली वडिलांची आठवण

ते पुढे म्हणाले की, आजही काहीजण जात आहेत आणि कोणी जात असेल तर जाऊ द्या. शिवसेनेला काही धक्का वगैरे बसत नाही. अस्वलाचा एक केस उपटला म्हणून असं टकलं होत नाही. अजूनही जर कोणी भाडोत्री असतील तर ते पण तुम्ही घेऊन जा. माझ्याकडे यादी पाठवा, मी त्यांना पाठवतो. नितीन यांनी उदाहरण दिले की, आमचं पीक जरी तुम्ही नेलं कापून तरी शेती आमची आमच्याकडेच आहे. शेतातले तण आम्ही काढून टाकतो. तुम्ही जी मेहनत घेतली आहे. ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. आपण भक्कम आहोत त्यांच्या छाताडावरती आपण उभे राहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed