• Sat. Sep 21st, 2024
मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून Good News, पुढच्या ७२ तासांत मान्सून या भागांत बरसणार

मुंबई : यंदा देशावर एल निनोचं संकट असताना मान्सून आगमनाच्या सुरुवातीलाच बिपरजॉय चक्रीवादळाने आपलं रौद्ररुप दाखवलं. याचा परिणाम राज्यातही पाहायला मिळाला. यामुळे यंदा मान्सूनही संत गतीने पुढे सरकत आहे. अशात महाराष्ट्रात मान्सूनने आपली वाट थांबवली होती. ११ जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला, यानंतर १५ जूनपर्यंत तो राज्यभर हजेरी लावणार होता. पण चक्रीवादळामुळे मान्सून कोकणातून पुढे सरकलाच नाही. या सगळ्यात आता मान्सूनसंबंधी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच मान्सूनचं मुंबईत आगमन होणार आहे. यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितल्यानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होण्यासाठी हालचली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून आता येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत हजेरी लावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Weather Forecast: पावसाबाबत आनंदाची बातमी; या तारखेपासून महाराष्ट्रातही धुवाँधार बरसणार, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

महाराष्ट्राच्या या भागात पावसाची शक्यता…

येत्या ७२ तासांत मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. तर २३ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. आता २३ जूनपर्यंत मान्सून प्रत्यक्षात येणार का, हे पाहावे लागेल.

मान्सून आगमन लांबणीवर; मिठागरांना फायदाच फायदा, १५ जूनपर्यंत चालणार मीठ संकलन

दरम्यान, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे गुजरातमधून राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुढे सरकले असले, तरी गुजरातमधील त्याची तीव्रता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून विविध जिल्ह्यांत सुसाट वारे वाहत आहेत. अर्थात, अजून काही दिवस असेच वारे वाहात राहणार आहेत आणि २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. यामुळे जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात २२ ते २३ जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे, असेही औंधकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. खरंतर, पावसाच्या उशिरा दाखल होण्यामुळे पेरण्या खोंळबल्या आहेत. पण आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल.

Weather Alert : कुठे मेघगर्जनेसह पाऊस, तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा; पुढील ५ दिवस असं असेल हवामान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed