भारतात आज मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी स्थिती अनुकूल असल्याचं ते म्हणाले आहेत. मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी दख्खनच्या पठारासह पश्चिम बंगाल, बिहारमध्ये स्थिती अनुकूल आहे. आगामी तीन दिवसांमध्ये ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
मान्सूनचा पाऊस खोळंबला, उष्णतेचे चटके
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचं आगमन लांबल्यानं निर्माण झालेल्या वातावरणामुळं देशभरात उष्णतेच्या लाटेचा त्रास होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांसह ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम राज्यात देखील उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे चटके बसत आहेत. तापमान वाढल्याचं देखील दिसून आलं आहे. विदर्भात जून महिन्यातील साधारण सरासरीच्या चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान अधिक असल्याचं नोंद समोर आलं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या चार दिवसात, विदर्भात उष्ण लहरी ते तीव्र उष्ण लहरींची शक्यता आहे. हवामान विभागानं यासंदर्भात यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ असेल.