• Sat. Sep 21st, 2024
ड्युटीवर असताना तलफ आली; बारमधील ओल्या पार्टीमुळे पोलीस दलाची मान खाली

चंद्रपूर: व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसे तलफ पूर्ण करण्यासाठी वाटेल ते पाऊल उचलतात. आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतोय याचे भामही अशांना नसते. पोलीस खात्यातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी तलफ भागवण्यासाठी कहरच केल्याची घटना समोर आली आहे. दिलेल्या बंदोबस्ताची जबाबदारी सोडत थेट बिअर शॉपी गाठली. तिथे बसून मनसोक्त बिअर ढोसली. मात्र , कर्तव्यावर असताना बिअर पिणे या दोन पोलिसांना चांगलेच अंगलट आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित केले आहे.

सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून, आईकडून शोध, लग्नात मारेकरी दिसला अन् माऊलीने तिथेच निकाल लावला
उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत. दोन जून रोजी ब्रह्मपुरी येथे जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मपुरी उपविभागातील पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.तळोधी पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होता. पोलीस कर्मचारी उमेश मस्के, नरेश निमगडे हे दोन कर्मचारी बंदोबस्तात कर्तव्यावर होते.

महिंद्रा पिकअपसाठी पोलिसांनी सापळा रचला, चाऱ्यातून निघाली लाखोंची दारू

आंदोलन सुरू असताना मस्के आणि निमगडे यांना बिअर पिण्याची तलफ झाली. दोघेजण बंदोबस्ताची जबाबदारी सोडत ब्रह्मपुरी येथील एका बिअर दुकानात गेले.तिथे त्यांनी बिअर ढोसली. ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी थेट बिअर शॉपी गाठली.आंबोरे यांनी या प्रकाराची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिली आहे.

ठाण्याच्या PI कडे बेहिशेबी मालमत्ता आली कुठून? अजितदादांनी आरोप करत रग्गड प्रॉपर्टीची लिस्ट वाचली!
जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चौकशी केल्यानंतर दोघे कर्मचारी दोषी आढळून आले. दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आल्याने जिल्हा पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. बिअरची तलफ भागविण्यासाठी जिल्हातील दोन पोलिसांनी केलेल्या कारनाम्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed