सांगली : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना पंचवीस वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा ठोठावण्यात आली आहे यशवंत मारुती ऐवळे (वय ६५) आणि निवास मारुती ऐवळे (वय ५८) असं या दोघा भावांची नावे आहेत. सांगली जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. कडेगाव येथील या दोघा भावांकडून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता.
पीडित अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा यशवंत मारुती ऐवळे यांनी खाऊ देण्याचं आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला होता. त्यानंतर चार महिन्यांनी पीडित मुलगी रस्त्यावरून दुकानाला जात असताना निवास मारुती ऐवळे याने ओढून नेऊन एका शेडमध्ये बलात्कार केला होता. या दोन्ही घटनेच्या वेळी सदर पीडित मुलीला दोन्ही भावांकडून तिला आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती.

अखेर मे २०२० मध्ये कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा खटला हा सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होता. ज्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने १० साक्षीदार, वैद्यकीय डॉक्टर आणि इतर पुराव्यांच्या आधारे यशवंत आणि निवास ऐवळे या दोघा भावांना २५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.