• Mon. Nov 25th, 2024
    Mira Road Murder: कोट्यधीश आहे सरस्वतीला मारुन तिचे तुकडे शिजवणारा मनोज साने

    ठाणे: ठाण्या जवळील मिरा रोड येथे घडलेल्या सरस्वती वैद्य हत्याप्रकरणात आता रोज नवनवीत माहिती समोर येत आहे. येथील मनोज साने या आरोपीने आपल्याच लिव्ह इन पार्टनरचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने ते तुकडे कुकरमधये शिजवले मग त्याची पेस्ट केली. जेव्हा या भयंकर घटनेचा पर्दाफाश झाला तेव्हा साऱ्यांनाच धडकी भरली. सध्या त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज साने हा बऱ्यापैकी शिकलेला होता. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचीही माहिती आहे.मनोज साने यांच्या मालमत्तेबाबत ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं की, ‘मनोज हा अनाथ आहे. मात्र, तरीही त्याच्या नावे एक २ बीएचके फ्लॅट आहेत, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. या फ्लॅटचं त्याला महिन्याला ४० हजार रुपये भाडं मिळायचं. यासोबतच मनोजलाही दारूचे व्यसन होते आणि तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या या कृत्यांमुळे त्याच्या दुकानाची कमाई कमी होत होती. या कारणावरून त्यांनी दुकानही बंद केले होते.

    कसा रचला हत्येचा कट? मृतदेहाची विल्हेवाट लावायची इतकी क्रूर पद्धत कशी सुचली? साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली
    मनोज साने याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी सुटल्यानंतर लोकांनी त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्याने थेट काहीही सांगितलं नाही. त्यामुळे शेजाऱ्यांचा संशय वाढला. शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितलं की, ‘५ जूनपासून दुर्गंधी येत होती. ७०४ मध्ये राहणारे दार उघडत नव्हते. जेव्हा मनोज साने याने दार उघडलं तेव्हा दुर्गंधी आणखी वाढली. मनोजने नीट काही उत्तरं दिली नाहीत आणि तो निघून गेला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस तेथे पोहोचताच मृतदेह कुजल्याची दुर्गंधी असल्याचं त्यांच्या लक्षात आले.

    पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

    जोडपं कधीच कोणाशी बोलत नसत

    लोकांनी सांगितलं की, सरस्वती नेहमी घरात राहायची आणि मनोज बाहेर जायचा. हे दोघंही कधी कोणाशी बोलताना दिसले नाहीत. त्यांच्या घरात एसी-कूलर आणि फ्रीज नव्हते. दिवाळी, होळी अशा सणांनाही या दोघांनी कधीच दार उघडले नाही. त्यांनी घराबाहेर कधी दिवाही लावला नाही, त्यामुळे आम्ही कधीच प्रश्न विचारला नाही. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात पूर्णपणे गुंतले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed