बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकणात किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी वाढले असून समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत आहेत. जिल्ह्यात गणपतीपुळे मंदिराजवळही शनिवारी पुन्हा पायरीजवळ भरतीचे पाणी आले होते. रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री हरिहरेश्वर येथेही मोठ्या लाटा उसळत होत्या. हरिहरेश्वर समुद्र किनारी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना बोलावून सायरन वाजून पर्यटकांना बाहेर येण्याचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातही दुपारनंतर अनेक ठिकाणी वारा सुटला होता. मात्र सुदैवाने या वाऱ्याचा वेग नियंत्रणात असल्याने कोठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी व खेड परिसरात काही ठिकाणी पावसाने रिमझिम सुरू केली होती. त्यामुळे गेले काही महिने उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला.
Alert Warning For Konkan Coast : अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपरजॉय हे पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे जात असून या वादळामुळे कोकण किनारपट्टीला इशारा देण्यात आला आहे. कोकणात किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी वाढल्याने हा इशारा देण्यात आला.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकणात किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी वाढले असून समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत आहेत. जिल्ह्यात गणपतीपुळे मंदिराजवळही शनिवारी पुन्हा पायरीजवळ भरतीचे पाणी आले होते. रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री हरिहरेश्वर येथेही मोठ्या लाटा उसळत होत्या. हरिहरेश्वर समुद्र किनारी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना बोलावून सायरन वाजून पर्यटकांना बाहेर येण्याचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातही दुपारनंतर अनेक ठिकाणी वारा सुटला होता. मात्र सुदैवाने या वाऱ्याचा वेग नियंत्रणात असल्याने कोठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी व खेड परिसरात काही ठिकाणी पावसाने रिमझिम सुरू केली होती. त्यामुळे गेले काही महिने उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.