• Sat. Sep 21st, 2024

Mira Road Murder : धक्कादायक! तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोज सानेने घेतला गुगलचा आधार

Mira Road Murder : धक्कादायक! तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोज सानेने घेतला गुगलचा आधार

Mumbai Mira Road Murder Case : मुंबईत शासकीय वसतिगृहातील तरुणीच्या हत्येचं प्रकरण गाजत आहे. त्याचबरोबर मिरा रोड येथील हत्येची भयंकर घटनाही चर्चेत आहे. या घटनेत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगलचा आधार घेतल्याचं समोर आलं आहे.

 

हायलाइट्स:

  • मिरा रोड येथील महिलेच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता नवीन माहिती
  • सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगल सर्च
  • चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील महिलेच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मनोज साने याने गुगलचा आधार घेत माहिती मिळवल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त तो चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले असून या दोघांचे नातेवाईकही आता पुढे आले आहेत.

मिरा रोडच्या गीता नगर परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या मनोज साने याने सरस्वती वैद्य हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. इतकेच नव्हे तर ते तुकडे त्याने कुकरमध्ये शिजवल्याचे तपासात उघड झाले. हे कृत्य करण्यापूर्वी मनोजने मृतदेहाची काही छायाचित्रेही काढली होती. याशिवाय मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी, तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय करावे ही माहिती मिळवण्यासाठी त्याने गुगलचा आधार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृतदेहाचे तुकडे करून ते शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, मिरा रोडमधील धक्कादायक प्रकार
आरोपी मनोज याने याआधी दोघेही अनाथ असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, मनोजचे काका व इतर नातेवाईक बोरिवली परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. सरस्वतीलाही पाच बहिणी असून त्यातील एक बहीण आता पोलिसांसमोर आली आहे. मनोज व सरस्वतीने तिच्या एका बहिणीच्या घरी जाऊन जेवणही केले होते. आरोपीने प्रथम आपण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, दोघांनी एका मंदिरात विवाह केल्याची माहिती मनोजने आता पोलिसांना दिली आहे.
…म्हणून सरस्वती वैद्यला प्राण गमवावे लागले, नीलम गोऱ्हेंनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
या दोघांची ओळख सन २०१२मध्ये सरस्वती नोकरीच्या शोधात असताना, बोरिवली परिसरात झाली होती. त्याआधी ती तिच्या बहिणीकडे राहायला होती. तत्पूर्वी ती अहमदनगर येथील आपटे अनाथ आश्रमात राहायला होती. या आश्रमात काही कागदपत्रे घेण्यासाठी सरस्वती मधल्या काळात गेली होती. यावेळेस तिने मनोजची ओळख मामा अशी तेथील लोकांना करून दिली होती. दोघेही मूळचे अहमदनगरचे असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पोलिसांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देत आरोपी मनोज पोलिसांना गुंगारा देत आहे. सरस्वतीची हत्या केल्याची कबुली त्याने अद्याप दिलेली नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed