• Mon. Nov 25th, 2024

    अनाथाश्रमात सांगायची हे माझे मामा, वयातील अंतरामुळे लग्नही लपवलं; मनोज-सरस्वतीची कहाणी काय?

    अनाथाश्रमात सांगायची हे माझे मामा, वयातील अंतरामुळे लग्नही लपवलं; मनोज-सरस्वतीची कहाणी काय?

    ठाणे: अख्ख्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या मिरा रोड येथील हत्याकांडात आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मिरो रोड येथे राहणाऱ्या मनोज साने नावाच्या व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यचा खून केला आणि मग तिच्या मृतदेहाचे १०० तुकडे केले. त्यानंतर त्याने विद्युत करवतीने आणि एस्को ब्लेडच्या सहाय्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर त्याने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले आणि मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट केली.

    मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने जी पद्धत अवलंबली ती पाहून साऱ्यांनाच शॉक लागला आहे. एखादी व्यक्ती इतकी क्रूर कशी असू शकते असाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आता या प्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं
    पोलिसांनी दिली नवी माहिती

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि सरस्वती हे दोघे लिव्ह रिलेशनशिपमध्येच राहत होते. सरस्वती ही अनाथ आश्रममध्ये वाढली, तिने १० वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. तिला तीन बहिणी असल्याची माहिती आहे. तिच्या सर्व बहिणी अनाथ आश्रममध्ये राहायच्या. बहिणींमध्ये सरस्वती सर्वात लहान होती.

    ती अनाथ आश्रममधून मुंबईला आपल्या नातलगाकडे आली. जॉब शोधत असताना मनोज आणि सरस्वतीची ओळख झाली. मुंबईत राहायचं कुठे हा प्रश्न होता. म्हणून त्याने बोरिवलीमध्ये फ्लॅट आहे मग तिथेच राहू असं म्हटलं. या दोघांनी मंदिरात लग्न केल्याचीही माहिती आहे.

    Crime News: भावजीच्या प्रेमात नवऱ्याला संपवलं, ५ दिवसांनी प्रियकरही मृत आढळला; खुनी नववधूची हादरवणारी कहाणी
    वय लपवण्यासाठी सांगायची माझे मामा आहेत

    वय लपवण्यासाठी अनाथ आश्रममध्ये सरस्वती मनोज साने माझा मामा आहे, असं सांगायची. पण तिने तिच्या बहिणींना सांगितलं होतं की त्यांनी लग्न केलं आहे. मनोज साने याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की सरस्वतीने आत्महत्या केली होती.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    बहिणींकडून मृतदेहाची मागणी

    मनोजचे वय जास्त असल्याने बाहेर कोणाला लग्न झाल्याचं सांगत नव्हते. सरस्वतीच्या तीन बहिणींनी पोलिस ठाण्यात भेट दिली. त्यांचेही जबाब नोंदवले आहेत. त्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. तिच्या बहिणींनी सरस्वतीच्या मृतदेहाची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed