• Sat. Sep 21st, 2024
Thane News : जिल्ह्यात २७ माध्यमिक शाळा अनधिकृत; ही आहे यादी

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एकूण २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून त्यापैकी १० अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. इतर १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबचे हमीपत्र सादर केले आहे. त्यामुळे पालकांनी जागृत राहून पाल्यांचा २०२३-२४ साठी प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये करू नये, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले.संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर ठाणे जिल्हा परिषदेमार्फत दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. या अनधिकृत शाळा-वर्ग तत्काळ बंद न केल्यास संबंधित संस्थाचालकांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई होईल. तसेच नोटीस देऊनही या अनधिकृत शाळा बंद न केल्यास एक लाख दंड वसूल केला करण्याची कारवाई होऊ शकते. त्यातूनही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

अनधिकृत असूनही सुरू असलेल्या शाळा –

अल मुनीहाज सेकंडरी हायस्कूल, बेलापूर, नवी मुंबई, स्टार इंग्लिश हायस्कूल, ठाणे मनपा क्षेत्र, डिवाईन ग्रेस हायस्कूल, वज्रेश्वरी ता.‍ भिवंडी, बी.एस.एस इंग्लिश स्कूल, गणेशनगर चितळसर, मानपाडा ठाणे, श्रीमती कावेरीताई पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, कळवा ठाणे, आर. एन. इंग्लिश स्कूल कोन गाव, भिवंडी ठाणे, फरान इंग्लिश मीडिअम स्कूल, गौरीपाडा, भिवंडी, ठाणे, ओमकार इंटरनॅशनल स्कूल, चौळे, ता. कल्याण जि. ठाणे, नारायणा ई-टेक्नो स्कूल, ढोकाळी गाव, ठाणे (प.), देविका इंग्लिश मीडिअम स्कूल, रेतीबंदर रोड, मौजे काल्हेर, ता. भिवंडी यांचा समावेश आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्याही क्षणी, तर ठाकरे गटाच्या नेत्याने केला वेगळाच दावा
शाळा बंद करण्याबाबत हमीपत्र सादर केलेल्या अनधिकृत शाळा

– सेंट पॉल इंग्लिश सेकंडरी हायस्कूल, चिंचपाडा नवी मुंबई मनपा क्षेत्र, श्री साई ज्योती सेकंडरी स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई, प्रगती विद्यामंदिर अंबरनाथ, युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, कल्याण, होली मारिया कॉन्व्हेन्ट हायस्कूल, ठाणे मनपा क्षेत्र, सिम्बॅायसिस कॉन्व्हेंट हायस्कूल ठाणे, आत्मन ॲकॅडमी ठाणे, ठाणे मनपा क्षेत्र, अरुणज्योत विद्यालय ठाणे, ठाणे मनपा क्षेत्र, नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे ता. भिवंडी, नूर हायस्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज, नूर बाग अल्मास कॉलनी रोड, कौसा मुंब्रा ठाणे, भागीरथी वझे एज्युकेशन व वेल्फेअर ट्रस्ट, मानपाडा गाव डोंबिवली (पू) जि. ठाणे, विद्या ज्योती स्कूल, डावले, ठाणे, डायमेन्शन इंग्लिश स्कूल, सर्व्हे नं ६०/३ मौजे कौसा, मुंब्रा, आदर्श विद्यालय, लोढा हेवन कल्याण, पारसिक स्पेशल स्कूल, मिरा भाईंदर ठाणे, आरकॉम इंग्लिश स्कूल, ठाणे, नालंदा हिंदी विद्यालय ठाणे मनपा क्षेत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed