काय आहे प्रकरण?
तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, रा. इगतपुरी घोटी, जि. नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४, रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू गुलाब सर्वडे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) या चार जणांसह जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, जि. नाशिक) आणि मीरा बन्सी विसलकर (वय ३९, रा. इगतपुरी घोटी, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी एकाच महिलेने दोन तरुणांचे लग्न लावून; तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करून नवरी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यावरून संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या महिलेकडून आणखी काही जणांची फसवणूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या प्रकरणाचा तपास केला असता सर्व आरोपी सापडले. त्यांनी २० ते २२ जणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
बनावट लग्न लावून ज्या तरुणांची फसवणूक करण्यात आली असेल, त्यांनी पुढे यावे आणि पोलिसांना माहिती द्यावी. ज्या मुलांची लग्ने ठरत नाहीत,अशा मुलांनी तसेच नातेवाईकांनी ज्या मुलीशी लग्न ठरेल तीच्या नातेवाईकांची माहीती घ्यावी ,यातून फसवणूक होणार नाही यासाठी सावधानता बाळगावी.- रवींद्र चौधर, उपविभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर