नांदेड -प्रतिनिधी
अष्टांगिक मार्ग हा गौतम बुध्दानी सांगितलेला काम ,क्रोध,द्वेष ,इत्यादी दोष दूर करुन जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे यास मध्यम मार्ग सुध्दा म्हणतात धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात बौध्द धर्माच्या शिकवणीतून अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहेअष्टांगिक मार्ग अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो निर्वाण म्हणजे मुत्यू नव्हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हि कल्पना समजावून देतांना म्हंटले आहे कि,निर्वाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्यावर प्रवुतींवर असणे निर्वाण म्हणजे निर्दोष काम,क्रोध,द्वेष,वगैरे दोष आपले जीवन दुषित करुन सोडतात हे दूर करुन जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे चार आर्य सत्य व अष्टांगिक मार्ग मनुष्यच्या दैनंदिन जीवनात या मार्गाने वाटचाल करेल तितके जीवन अधिक आनंदी होईल म्हणून चार आर्य सत्य व अष्टांगिक मार्गाने वाटचाल केल्यास मानवी जीवन अधिक आनंदी होईल असे प्रतिपादन भंदंत धम्मसेवक महास्थवीर यांनी नालंदा बुध्द विहार हिमायतनगर येथे बुध्दरुपाची प्रतिष्ठापना प्रसंगी केले.
या वेळी नालंदा बुध्द विहार हिमायतनगर येथे दिनांक 3 जून 2023 शनिवार रोजी सकाळी बुध्द पहाट भीम स्वरांजली कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर बुध्दरश्मीध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य डी. डी. घोगरे यांच्या हस्ते झाले त्यानंतर बुध्दरुपाच्या मूर्तीची हिमायतनगर शहरातील प्रमुख मार्गाने धम्म रॅली काढण्यात आल्यानंतर बुध्दरुपाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा नालंदा बुध्द विहार हिमायतनगर येथे करण्यात आली नंतर भिक्युसंघास भोजनदान देऊन पूज्य भिक्युसंघाची धम्मदेसना भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा,भदंत विनय बोधीप्रिय महाथेरो नांदेड,भिक्यु पय्यारतन थेरो नांदेड यांच्या उपस्थित धम्म देसना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा हिमायतनगर व समस्त बौध्द उपासक तथा उपासिका हिमायतनगर यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सदरील कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस चोख बंदोबस्त ठेवला होता.