• Sat. Sep 21st, 2024

Mumbai : मुंबईकरांसाठी अलर्ट! पाणी पुरवणाऱ्या तलावात अत्यंत कमी साठा, कपातीची शक्यता

Mumbai : मुंबईकरांसाठी अलर्ट! पाणी पुरवणाऱ्या तलावात अत्यंत कमी साठा, कपातीची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलावांमध्ये ४ जून २०२३पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. यातून पुढील महिनाभर मुंबईकरांची तहान भागू शकेल. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे पालिकेकडून तलावक्षेत्रातील पाणी पातळीचा आढावा घेतला जात आहे. पुढील नियोजन म्हणून १० ते १५ टक्के पाणीकपात होऊ शकते, असा अंदाज आहे.यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसे झाल्यास मुंबईत जूनमध्येच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षी जूनमध्ये ९.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने २७ जून २०२२ रोजी १० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती.‌ या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन काय निर्णय घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे.

जेजे रुग्णालयातील डॉक्टरांचा ४ दिवसांनंतर अखेर संप मागे; पुन्हा पूर्ण क्षमतेने कामावर होणार रुजू
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ४ जून रोजी सातही धरणांत १ लाख ७४ हजार ९३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी! यंदा मुंबईची तुंबई नाही; महापालिकेचे ‘या’ भागांत खास नियोजन
राखीवसाठ्यावर मदार

भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष लिटर व अप्पर वैतरणा धरणातून ७५ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा पालिकेला मिळणे अपेक्षित आहे. राखीव पाणीसाठा उपलब्ध झाल्यास जुलैपर्यंत मुंबईकरांची तहान भागवता येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तलावांतील जलसाठ्याची सद्यस्थिती

तलाव पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) टक्के

अप्पर वैतरणा ०

मोडक सागर ३४,७०० २६.९२

तानसा ३४,१३४ २३.५२

मध्य वैतरणा २२,४०९ ११.५८

भातसा ६९,१३३ ९.६४

विहार ७,३२७ २६.४५

तुलसी २,४९९ ३१.०६

वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांची सेवानिवृत्ती, नागरिकांकडून जल्लोषात निरोप

तीन वर्षांतील ४ जून रोजीचा साठा

वर्ष दशलक्ष लिटर ( टक्के)

२०२३ १,७४,०९३ (११.७६)

२०२२ २,३४,५१९ (१६.२०)

२०२१ १,९७,०५९ (१३.६२ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed