• Sat. Sep 21st, 2024
कंटेनरमध्ये बेसन आणि सोयाबीनच्या गोण्यांमागे होतं असं काही…; पाहताच पोलिसांना फुटला घाम…

अहमदनगर : सध्या देशात अंमली पदार्थाच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतेच इंदौरमधून गुटखा तस्करीचं प्रकरण समोर आलं आहे. इंदौरहून कंटेनरमध्ये सोयाबीन आणि बेसनच्या गोण्यांच्या मागे बेकायदा गुटख्याच्या शेकडो गोण्या भरून पुण्याच्या दिशेने जात होत्या. या कंटेनरला कोपरगाव तालुका पोलिसांनी तालुक्यातील येसगाव शिवारात नगर मनमाड महामार्गावरून ताब्यात घेतलं आहे. या कंटेनरमध्ये गुटख्याच्या लाखो रुपये किंमतीच्या शेकडो गोण्या आढळून आल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याकडून ५० लाखांचा गुटखा आणि कंटेनरसह कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एक कंटेनर सोयाबीन आणि बेसन पीठाच्या गोण्यांच्या मागे अवैध पद्धतीने महाराष्ट्र राज्यात कायद्याने बंदी असलेल्या गुटख्याच्या गोण्या भरून वाहतूक होत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपल्या फौजफाट्यासह येसगाव शहरात पोहोचले. त्यांनी चालत्या कंटेनरला अडवून खात्री केली असता त्यामध्ये गुटख्याच्या शेकडो गोण्या आणि बॉक्स मिळून आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कंटेनरमधून सर्व गोण्या बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर चालक जमील अहमद इद्रिस अहमद राहणार हरियाणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खतरनाक! महिला शिक्षण अधिकारी लाच घेताना रंगेहाथ, घरात सापडली ८५ लाखांची रोकड, ३२ तोळं सोनं
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कूसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, रशीद शेख, जयदीप गवारे, पोना रामा साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मस्के, प्रकाश नवाली युवराज खुळे आदींनी केली आहे.

चादरीसारखा फोल्ड होणारा रस्ता, केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकाकडून पाहणी, सत्य समोर येणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed