• Sat. Sep 21st, 2024
तुकाराम मुंढेंची महिन्याभरातच पुन्हा बदली, वीस IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर

मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. अवघ्या महिन्याभरातच मुंढेंची बदली करण्यात आली. मुंढेंसह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलींचे आदेश काढण्यात आले आहेत.तुकाराम मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत तब्बल २० वेळा बदली झाल्याची माहिती आहे. जेमतेम महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. खरं तर त्यापूर्वीच्या बदलीनंतर अनेक महिने मुंढेंना नियुक्ती मिळाली नव्हती. मात्र राज्य शासनाने तीन मे रोजी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते, त्यात तुकाराम मुंढेंच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे मुंढेंचा अनेक महिन्यांचा वनवास संपल्याचीही चर्चा होती. त्यातच आता पुन्हा मुंढेंच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.

माजी राज्यमंत्र्यांच्या भावाला फसवलं, ४० हजारांचा चुना लावला, कारण ठरली ‘ताडोबाची सफर!’

कोणकोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली?

1. सुजाता सौनिक (1987) – गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी

2. एस वी आर श्रीनिवास (1991) विशेष कर्तव्य अधिकारी (OSD), धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई

3. लोकेश चंद्र (1993) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD), MAHADISCOM, मुंबई

4. राधिका रस्तोगी (1995) यांना प्रधान सचिव आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

5. आय ए कुंदन (1996) प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

तुकाराम मुंढेंनी गरिबांना लुटणाऱ्यांना सरळ केलं, त्यामुळेच बदली झाली | हेरंब कुलकर्णी

6. संजीव जयस्वाल (1996) उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, मुंबई

7. आशीष शर्मा (1997) प्रधान सचिव (2), नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई

8. विजय सिंघल (1997) महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई

9. अंशु सिन्हा (1999) सचिव, OBS बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई

10. अनुप कृ. यादव (2002) सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई

बाळासाहेबांनी अहमदनगरला दुसरंच नाव दिलेलं, मग शिंदेंनी हरताळ का फासला? ठाकरे गट आक्रमक
11. तुकाराम मुंढे (2005) सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई

12. डॉ. अमित सैनी (2007) मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई

13. चंद्रकांत पुलकुंडवार (2008) साखर आयुक्त, पुणे

14. डॉ. माणिक गुरसाल (2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई

15. कादंबरी बलकवडे (2010) महासंचालक, MEDA, पुणे

16. प्रदीपकुमार डांगे (2011) संचालक, रेशीम उद्योग, नागपूर

17. शंतनू गोयल (2012) सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक

18. पृथ्वीराज बी.पी. (2014) संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई

19. डॉ. हेमंत वसेकर (2015) आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

20. डॉ. सुधाकर शिंदे (1997) अतिरिक्त महापालिका आयुक्त (BMC) मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed