नंदू जोशी यांनी आपली सदनिका आपणास खाली करण्यास भाग पाडले आणि आपल्याकडे शारीरिक सुखाची वारंवार मागणी केली, अशी तक्रार पीडितने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पती आणि पीडित पत्नी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. या प्रकरणात जोशी हस्तक्षेप करत असल्याचा पीडितेचा आरोप आहे. नंदू जोशी हे पीडितेच्या पतीचे मित्र असून पोटगी रक्कम देण्यासाठी ते या महिलेच्या घरी जात होते. त्याचदरम्यान त्यांनी हे कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सदर महिलेच्या तक्रारीवरून जोशी यांच्याविरोधात पोलिसांनी भादंवि संहितेच्या कलम ३५४(अ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्व भाजपाचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांनी स्वतःवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित महिलेशी मागील १० वर्षांत आपण कधी संवाद साधला नाही. मोबाईलवर संभाषणही केले नाही. आपण फक्त या महिलेच्या पतीला मित्र म्हणून विविध प्रकरणात सहकार्य करतो. जोशी यांच्यामुळे पती आपणास त्रास देतो, असा गैरसमज या तक्रारदार महिलेचा झाला. म्हणून आपल्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कायद्याने जी कारवाई करायची आहे ती करावी. आपण अटकपूर्व जामीन घेणार नाही, असे जोशी यांनी पत्रकारांना फ़ोन वरून सांगितले, मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला.दरम्यान डोंबिवलीतील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्या गुरूवारी सकाळी ११ वाजता मानपाडा पोलिस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करणार आहेत. याची दखल घ्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. मात्र याबाबत इतर पक्षांनी सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.