• Sat. Sep 21st, 2024

VIDEO: TBM मावळ्याने मोहिम फत्ते, गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क बोगद्याचे खणन काम पूर्ण

VIDEO: TBM मावळ्याने मोहिम फत्ते, गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क बोगद्याचे खणन काम पूर्ण

मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा कोस्टल रोड वरील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचे खणन काम आज पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठे टीबीएम मशीन असलेल्या मावळा या मशीनच्या सहाय्याने ही मोहीम फत्ते करण्यात आली आहे

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगावं चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणन्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, तसेच एल अँण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टिबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस या दोहोंनीही मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी-कामगारांचे अभिनंदन केले. हे काम आव्हानात्मक होते. ते पूर्ण झाल्याने आपण सर्व एका महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही काढले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भुमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे.

समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटर्सचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. मुंबईत असे महत्वाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यांना केंद्राकडून विशेषतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी आहे. आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रय़त्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय
या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातीहा हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed