मुंबई : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यातही बदलतं हवामान पाहायला मिळालं. राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात मे महिना आला तरी अवकाळी पावसाचा तडाखा शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. अशात आज हवामान खात्याकडून राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात काही भागांमध्ये कडक ऊन तर काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच ३१ मे रोजी मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या आणखी तीव्र झळा सहन कराव्या लागणार आहे. तर पुढच्या २४ तासात मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उकाडा कमी झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. याआधीच रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा दिलासा आहे.

दरम्यान, देशातल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सध्या चक्रवातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील ३-४ तासांत राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांवर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये हलक्या पावसाचे रूपांतर मध्यम पावसात होण्याची दाट शक्यता आहे.