• Sat. Sep 21st, 2024
खेळता-खेळता मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, सहा वर्षांच्या चिमुरडीचं हास्यच हरपलं

रायगड: मोबाईलचा स्फोट होऊन अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन ६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.ही घटना महाड तालुक्यातील आंबीवली गावात घडली आहे. घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. अनिता दिनेश वाघमारे (वय सहा वर्ष) असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना शनिवार दुपारच्या सुमारास घडल्याची महिती समोर आली आहे.

आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी रेल्वेत बसवलं, चालत्या ट्रेनमधून उतरताना पडून लेकाचा मृत्यू
माहितीनुसार, आंबिवली येथील आदिवासी वाडी परिसरातील अनिता दिनेश वाघमारे (६ वर्ष) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेत तिच्या तोंडाला व जबड्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. तिला जखमी अवस्थेत तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान या सगळ्या गंभीर घटनेची नोंद महाड पोलीसात करण्यात आलेली नाही.

आजोबा चहा पित होते, अचानक खिशातल्या मोबाईलने पेट घेतला, दणादणा उड्या मारल्या, नशीब आग विझली

या संपूर्ण घटनेसंदर्भात मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याचा तपशील कळू शकलेला नाही. अलिकडे लहान मुलांच्या हातात सातत्याने मोबाईलचा वाढलेला वापर हा चिंताजनक विषय ठरत आहे. या घटनेमुळे पालकवर्गात मात्र चिंतेचे वातावरण असून मुलांना जास्त मोबाईलच्या आहारी जाऊ देणे याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र ज्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला तो नेमका कोणत्या बनावटीचा होता याचा तपशील समजू शकलेला नाही.

मैत्री ठरली प्रणयसाठी जीवघेणी, पट्टीचा पोहणारा मुलगा बुडाला कसा? कुटुंबाच्या संशयाने गूढ उकललं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed