• Sat. Sep 21st, 2024
तीन पिढ्यानंतर घरात मुलगी झाली; बापाने सनई चौघडे वाजवत लेकीची मिरवणूक काढली

प्रसाद शिंदे,अहमदनग : जिल्ह्यातील सावेडी परिसरातील रासने नगर येथील कावळे परिवाराच्या कुटुंबामध्ये तब्बल तीन पिढ्यानंतर मुलीचा जन्म झाल्याने त्या गोंडस मुलीचे स्वागत करण्यासाठी सनई चौघडे वाजवत रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत स्री जन्माचे स्वागत केले. यावेळी कावळे परिवाराच्या घरामध्ये भव्य अशी फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच रथाला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या सोहळ्याला उपस्थित असलेल्या नातेवाईकांनीही जन्मलेल्या बाळाचे आणि आई-वडिलांचे औक्षण करून स्वागत केले. आजही अनेक ठिकाणी मुलीचा जन्म झाला की तिचा तिरस्कार केला जातो, काही वेळा मुलगी नको म्हणून गर्भपात केला जातो. मात्र, कावळे परिवारामध्ये त्यांच्या तीन पिढ्यानंतर घरात मुलगी जन्मल्यामुळे तिचे जंगी स्वागत करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे‌.

घरची परिस्थिती बेताचीच, पण स्वप्न मोठी होती… UPSC परिक्षेत संगमनेरच्या तिघांचा झेंडा!
कुटुंबामध्ये आज आनंदाचा दिवस आहे, घरात कन्यारत्नाच्या रूपात साक्षात लक्ष्मी जन्मली आहे.दोघा भावंडांना बहीण नसल्यामुळे जन्मलेल्या मुलीचे काका, आजी आणि वडिलांनी सुंदर असं स्वागत केलं असून कावळे कुटुंबामध्ये स्वामी समर्थ्यांच्या कृपेने चालती बोलती लक्ष्मी आली असल्याची भावना मुलीचे आजोबा नितीन रामदासी आणि संध्या कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

आज तीन पिढ्यानंतर आमच्या घरात मुलगी जन्माला आली. मुलगा जन्माला आला की जगणं सोपं होतं आणि मुलगी जन्माला आली की मरणं सोपं होतं असं आपल्याकडे म्हटल जातं. हा गैरसमज आहे असं म्हणत आई भाग्यश्री कावळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच आज देखील मुलींच्या जन्माबद्दल समाजात अजूनही नकारात्मक भावना आहेत. आपल्या समाजात मुलींच्या कार्यक्षमतेवर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आले आहे.

UPSC Success Story: वडिलांची चहाची टपरी, आई विडी कामगार; संगमनेरच्या मंगेशची UPSC मध्ये बाजी
अंतराळवीर कल्पना चावला, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच विद्यमान राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मु यांच्याकडे पाहून मुलींच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणार नाही.आपल्याकडे जुनी संकल्पना होती की, मुलगा हा वंशाचा दिवा असतो मात्र आता मुलींना देखील वंशाचा दिवा मानायला काही हरकत नसावी असे म्हणत तिचे वडील रोहित कावळे यांनी चिमुकलीच्या जन्माचे स्वागत केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed