• Sat. Sep 21st, 2024

Chhatrapati Sambhajinagar : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीची चर्चा; जूनमध्ये घोषणेच्या हालचाली सुरु

Chhatrapati Sambhajinagar : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीची चर्चा; जूनमध्ये घोषणेच्या  हालचाली सुरु

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन सुमारे सव्वादोन महिने होत आल्याने नूतन जिल्हाध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नूतन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत पक्षपातळीवर आता जोमाने हालचाली सुरू झाल्या असून, प्रदेशस्तरावरील दोन नेत्यांनी नुकतीच येथील जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मतेही जाणून घेतली. जिल्हाध्यक्षपदासाठी प्रामुख्याने तीन ते चार नावे चर्चेत आली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने नावाची घोषण होईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.भाजप केंद्रासह राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्षपदास चांगलेच वलय प्राप्त झाले आहे. दरम्यान. भाजपचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस व संघटनात्मक निवडणूक अधिकारी सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ जानेवारी २०२० मध्ये आयोजित बैठकीत भाजप शहराध्यक्ष म्हणून संजय केणेकर, तर जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची निवड झाली होती. शहराध्यक्ष म्हणून केणेकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाच सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे नोव्हेंबर २०२२ अखेरीस नूतन शहराध्यक्ष म्हणून शिरीष बोराळकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. दुसरीकडे जिल्हाध्यक्षपदी असलेले विजय औताडे यांचा कार्यकाळ दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे गेल्या काही दिवसांपासून जोमाने वाहू लागले आहेत.

दरम्यान, नूतन जिल्हाध्यक्ष पदाच्या अनुषंगाने प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, संजय केणेकर यांनी जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, मंडळस्तरावरील पदाधिकारी, विविध आघाडी, मोर्चाचे अध्यक्षासह येथील प्रदेशस्तरावरील पदाधिकाऱ्यांशी समोरासमोर चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. त्याबाबतच अहवालही तयार झाल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी तीन ते चार नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत. दुसरीकडे यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून सलग दोन वेळा संधी देण्यात आली आहे. हे सर्व पाहता नूतन जिल्हाध्यक्ष कोण होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रश्न विचारल्यावर मोदींचा ‘मिस्टर इंडिया’; कॉंग्रेस प्रवक्त्या अनुमा आचार्य यांचा खरमरीत टोला
जिल्हाध्यक्ष निवडीनंतर शहर कार्यकारणीत फेरबदल

शहराध्यक्षपदी बोराळकर यांची काही महिन्यापूर्वीच निवड झाली. परंतु उर्वरित कार्यकारणीचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने पदाधिकारी तेच कायम राहिले होते. दरम्यान, कार्यकारणीची तीन वर्षांची मुदत फेब्रुवारी २०२३ अखेरीस पूर्ण झाली. त्यामुळे शहर सरचिटणीसपदासह कार्यकारणीवर वर्णी लागावी, यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. ‘ग्रामीण’च्या जिल्हाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारणीतही फेरबदल होतील, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

जिल्हाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने नुकतीच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून मत जाणून घेण्यात आली आहेत. पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार होईल.- संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed