पुणे : पुणे महापालिकेने १९७५ मध्ये अतिशय उत्तम दर्जाचा जंगली महाराज रस्ता तयार केला. तेव्हापासून आज पर्यंत या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यावर पॅचवर्क नाही, त्यावरील खडी कधीही निघून जात नाही. त्यामुळे उत्तम कामाचा नमुना म्हणून या रस्त्याचे महत्त्व आहे. पण आता आपटे रस्त्यावर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर सुमारे ३० ते ३५ फूट लांबीच्या रस्त्यावर खोदकाम करण्याची नामुष्की येणार आहे.डेक्कन जिमखाना परिसर, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता या भागात वेताळ टेकडी, फर्ग्युसन महाविद्यालया मागील टेकडी येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येते. गेल्या काही वर्षात कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याने शहराच्या अनेक भागात पाणी तुंबत आहे. त्याचा सर्वाधिक फटका या भागात बसत आहे.
जंगली महाराज रस्त्यावर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दोन्ही रस्त्यांवर २५ कोटी रुपये खर्च पादचारी मार्ग करताना जी पावसाळी गटारांची व्यवस्था केली ती कमी क्षमतेची असल्याचे समोर आले. त्यामुळे येथे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जंगली महाराज रस्त्यावर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दोन्ही रस्त्यांवर २५ कोटी रुपये खर्च पादचारी मार्ग करताना जी पावसाळी गटारांची व्यवस्था केली ती कमी क्षमतेची असल्याचे समोर आले. त्यामुळे येथे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार कोहिनूर हॉटेलपासून प्रयाग हॉस्पिटल ते जंगली महाराज रस्त्यावर भोसले शिंदे आर्केड अशी ४०० मीटर लांबीची ९०० मीमी व्यासाची नवी पावसाळी गटार टाकले जाणार आहे. शिंदे आर्केडच्या विरुद्ध बाजूस नवे चेंबर तयार करून तेथील भूमीगत नाल्याला हे पाइप जोडले जातील.
पण हे काम करताना जंगली महाराज रस्त्यावर खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे एकही खड्डा नाही असा जंगली महाराज रस्ता जेसीबीने तोडला जाईल. तसेच चेंबरसाठी खड्डे करावे लागणार आहेत.