• Mon. Nov 25th, 2024
    Crime News: कोल्हापूर पोलिसांना संशय, सापळा रचला; गाडी थांबवून उघडताच फुटला घाम

    कोल्हापूर : विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून त्यांच्याकडून तब्बल १० कोटी ७४ लाख १० हजार किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करत ५ जणांना पकडण्यात यश आलं आहे. ही आजपर्यंतची कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांत कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटीची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत कोल्हापूर पोलिसांनी दोन ते तीन वेळा सापळा रचून व्हेल माशाची उलटी जप्त केली असतानाच आज पुन्हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील गवसे तालुका आजरा येथे आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी जप्त केली.

    Titanic जहाजेसंबंधी मोठी बातमी, बुडाल्याच्या १११ वर्षानंतर चमत्कार; सगळ्यात मौलव्यान वस्तू सापडली
    ही आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून या व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम इतके आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी कुडाळच्या ५ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, आजरा पोलिसांनी सकाळपासूनच अंबोली आजरा मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून बसले होते.

    दरम्यान, या मार्गावरून सदर संशयित आरोपी गाडी क्रमांक MH ०१ BG ०५९० या काळ्या रंगाच्या टाटा सफारी गाडीतून आणि हिरो कंपनीच्या MH ०७ AD ७७५८ या दुचाकीवरून जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली असता आणि गाडीची तपासणी केली असता त्यात विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या वाहतूक करत असतानाचे मिळून आले.

    या प्रकरणी संशयित आरोपी अकबर याकुब शेख व.व. ५१ रा. पिंगोली मुस्लिमवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, शिवम किरण शिंदे व.व. २३ रा. अभिनवनगर नं. ०२ कुडाळ जि. सिंधुदुर्ग, गौरव गिरीधर केरवडेकर व. व.३३ रा. केरवडे तर्फ माणगाव ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग, इरफान इसाक मणियार व. व. ३६ रा. पोस्ट ऑफिस गणेशनगर. कुडाळ जि.सिंधुदुर्ग आणि फिरोज भावुदिन ख्वाजा व. व. ५३ रा. कोलगाव ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.
    Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed