• Sat. Nov 16th, 2024

    पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    ByMH LIVE NEWS

    May 27, 2023
    पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 27 (जिमाका) :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यामार्फत खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ‌्या कंपन्यांमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून शासन आपल्या दारी या उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि. 01 जून 2023 रोजी मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, साईनंदन कॉलनी, रमा उद्यानजवळ, मिरज येथे सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तरुण तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केले.

    या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकीत 65 पेक्षा अधिक आस्थापनांकडून 10 वी पास/ नापास,12 वी, आयटीआय, पदवीका, पदवीधर व पदव्युत्तर पदवी या क्षेत्रातील उमेदवारांसाठी 2750 पेक्षा ‍अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच स्वयंरोजगार करु इच्छीणा-या उमेदवारांना शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ इत्यादी महामंडळे, स्टार्टअपबाबत मार्गदर्शन व कौशल्य विकास प्रशिक्षण देणा-या संस्था यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची/अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. तरी नोकरी इच्छूक बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी https:\\mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी.  तसेच सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेची मूळ/छायांकीत कागदपत्रे व बायोडाटाच्या 3 प्रतीसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून सदर संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

    अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क क्र. 0233-2990383.

    या रोजगार मेळाव्यामध्ये टाटा ऑटोकॅम्प सिस्टम लि चाकण, पुणे हायर अप्लायांस इंडिया प्रा.लि. रांजणगाव, पुणे, एस. के. एफ इंडिया प्रा.लि. चिंचवड, पुणे, टाटा मोटर्स पिंपरी चिंचवड, पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लि. चाकण, पुणे, मग्ना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि. पुणे, गॅस्टम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि. सिपला प्रा. लि. मुंडवा, पुणे, भारत फोर्ज लि. पुणे, एस बी रेशेलर प्रा. लि, कोल्हापूर, इंडो काडंट इंडस्ट्रीज लि, हातकणंगले, किर्लोस्कर ऑईल इंजिन, लि. कागल, कोल्हापूर, घोडावत कोसुमर प्रा. लि. हातकणंगले, लक्ष्मी पंम्स प्रा. लि. कागल, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. उचगाव कोल्हापूर अशा नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच स्वयंरोजगारसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध महामंडळाचा स्टॉल यावेळी लावण्यात येणार आहे. अशी माहिती कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.

    एमटीडीके रन’ चे आयोजन

    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या जन्मदिनानिमित्त एमटीडीके रन आयोजन करण्यात आले असून, सदर स्पर्धा ही रविवार दि. ०४ जून २०२३ रोजी पहाटे ५.३० ला सुरुवात होईल, सदर स्पर्धा खुल्या असतील व ५ कि.मी. व १० कि.मी. या Category मध्ये असतील. सदर स्पर्धेसाठी आतापर्यंत २४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून जास्तीत जास्त ५०० स्पर्धक नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे. सदर स्पर्धेमध्ये विजेत्यास करंडक, प्रमाणपत्र व T-shirt बक्षीस दिले जाईल. त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. ही स्पर्धा १० कि.मी साठी गांधी चौक मिरज ते विश्रामभाग (आलदर चौक) येथेपर्यत होईल व ५ कि.मी. साठी गांधी चौक मिरज ते भारती हॉस्पिटल कॉर्नर पर्यत येथेपर्यंत होईल. सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी ४००/- रुपये असेल.

     आरोग्य शिबिरांचे आयोजन

    मिरज तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते आहे. त्यामध्ये नेत्र चिकित्सा, नेत्र शस्त्रक्रिया, गरोदर स्त्रियांच्या विविध तपासण्या, रक्त दाब, मधुमेह इत्यादीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तरी तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ.खाडे यांनी केले आहे.

    000000

    बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता, मात्र त्यांच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसता, प्रियांका गांधींचा मोदींवर घणाघात
    मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून पाहणी – महासंवाद
    मतदारांना सुविधा तर आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे निर्देश – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed