• Tue. Nov 26th, 2024

    नितीन गडकरी धमकी प्रकरणी चौकशीसाठी NIAचे पथक नागपुरात; जाणून घेतली कांथाची जन्मकुंडली

    नितीन गडकरी धमकी प्रकरणी चौकशीसाठी NIAचे पथक नागपुरात;  जाणून घेतली कांथाची जन्मकुंडली

    Nagpur News : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून कांथाची माहिती घेतली. आत कोणीही येऊ नये म्हणून सहा तास बंदद्वार विचारपूस करण्यात आली.

     

    एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी केली ६ तास चौकशी
    नागपूर : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून घातपात घडविण्याची धमकी दिल्याप्रकरणाच्या तपासाला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. दोन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सिव्हिल लाइन्समधील पोलिस जिमखाना येथे संबंधित अधिकाऱ्यांकडून तब्बल सहा तास याप्रकरणाची माहिती घेतली.धमकी व खंडणी प्रकरणात धंतोली पोलिसांनी कुख्यात जयेश पुजारी ऊर्फ कांथाला अटक केली. सध्या कांथा हा कारागृहात आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक नेत्यांना धमकी दिल्याचे उघड झाले. या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचे उपमहानिरीक्षक व अधीक्षक दर्जाचे दोन अधिकारी गुरुवारी सकाळी नागपुरात आले. त्यांनी प्रकरणाशी संबंधित दस्तऐवजांची सहा तास पाहणी केली. कांथाबाबतही माहिती घेतली. या माहितीच्या आधारे एनआयए आता तपासाची दिशा ठरविणार आहे. चौकशीनंतर सायंकाळी दोन्ही अधिकारी मुंबईला गेले.
    हॅलो…मी मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसमधून बोलतोय! महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed