• Mon. Nov 25th, 2024
    नदीत आंघोळ करताना पाण्याचा अंदाज चुकला, आईच्या डोळ्यादेखत लेकरु बुडालं

    नाशिक: कपडे धुण्यासाठी परिवारासह गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सोमवारी चार वाजताच्या सुमारास घडली. आईच्या डोळ्या देखतच अवघ्या बारा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील आदित्य वसंत नाठे हा बारा वर्षीय मुलगा आपली आई योगिता सोबत कपडे धुण्यासाठी दारणा नदीवर गेला होता. त्यांच्यासोबत चुलता चुलती आणि उन्हाळी सुट्टी असल्याने गाडीत बसून तिघे भावंडेही नदीवर आली होती.

    दारणा नदी काठ परिसरात महिला नेहमीच कपडे धुण्यासाठी गर्दी करत असतात. दोन दिवसांपूर्वीच मुकणे धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे, त्यामुळे नदी तुडुंब भरुन वाहत होती. घरातील कपडे धुण्यासाठी नाठे कुटुंब देखील त्या ठिकाणी गेले होते. कपड्यांल्यानंतर गाडीही धुण्यात आली. यावेळी कडक उन्हामुळे नदीत आंघोळ करण्याचा मोह आदित्यला आवरता आला नाही.

    VIDEO | लाडक्या शिक्षकाची १४ वर्षांनी बदली, गावकऱ्यांकडून मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर
    आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य नदीत बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या चुलत भावांनी त्याला पाहिले. त्यांनी घरच्यांना आवाज दिला, तेव्हा आदित्य गटांगळ्या खात होता. आईने खूप आरडाओरडा केला मात्र त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. डोळ्यांदेखत मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून आईने मोठ्याने हंबरडा फोडला. मात्र पाण्याच्या प्रवाहात आदित्य खोलवर बुडाला होता. दुर्दैवी आईच्या डोळ्यांसमोरच पोटच्या मुलाचा पाण्यात बुडून अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    केरळच्या मलप्पुरममध्ये डबल डेकर बोट उलटली; 21 पर्यटकांचा बुडून मृत्यू, 10 जण बचावले

    घटनेनंतर मालेगावहून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही पाण्याचा प्रवाह आणि अंधार पडत असल्याने बचावकार्यात अडचण येत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा रेस्क्यू सुरु केल्यानंतर सात वाजता अखेर मृतदेह सापडला. घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

    पतीनिधनानंतर दुसरा आधारही हरपला, १८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खंबीर मातेचा आदर्श निर्णय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *