• Mon. Nov 25th, 2024

    पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; या दिवशी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

    पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; या दिवशी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराला बसला आहे. या पार्श्वभूमीवर या जलकेंद्रातून पाणीपुरवठा बंद ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. दक्षिण पुण्याच्या काही भागात यापुढे गुरुवारऐवजी आता वेगवेगळ्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा फटका पुढील दोन ते तीन दिवस बसतो. या केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराला विस्कळित पाणीपुरवठा होत असल्याने तो बंद ठेवण्याबाबत फेरनियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार परिसरनिहाय येत्या गुरुवारपासून वेगवेगळ्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

    Jalgaon News: एकटाच नदीवर गेला, आजाराकडे दुर्लक्ष करत पाण्यात उडी, अन् नको तेच घडलं…
    सोमवार

    सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, जाधवनगर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, सिंहगड रस्ता परिसर, कांडगे पार्क, मोहिते टाउनशिप परिसर, खोराडवस्ती परिसर, वडगाव बुद्रुक, वडगाव बुद्रुक- चव्हाणबाग, डीएसके रस्ता, व्यंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लिस सोसायटी परिसर, नांदेड फाटा, राजयोग सोसायटी, आनंद मंगल कार्यालय, अभिरुची, समर्थनगर, दांगटनगर, नारायणबाग, धायरी परिसर, गोयल गंगा, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनल पार्क, माणिकबाग परिसर, हायवे-बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव शिवसृष्टी परिसर, विकासनगर, घुलेनगर, निवृत्तीनगर, विष्णूपुरम, तुकाईनगर.

    मंगळवार

    आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, दत्तनगर, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, आचलफार्म.

    बुधवार

    बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे क्रमांक २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल, आंबेगाव पठार, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, सर्वे क्रमांक १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठामागील संपूर्ण परिसर.

    गुरुवार

    सहकारनगर भाग एक, दाते बसस्टॉप, धनकवडी सर्वे क्रमांक २, ३, ७, ८, धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे क्रमांक ३४, ३५, ३६, ३७, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर.

    शुक्रवार

    गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडेनगर, जाधवनगर, उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, सुंदरबन सोसायटी, महादेवनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागरनगर भाग- एक, अंबामाता मंदिर परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टॉवर, गंगा ओशियन, हिरामन बनकर शाळा, स्वामी समर्थनगर.

    Gold Price Today: ग्राहकांनो, अशी संधी पुन्हा नाही; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तपासा आजचा भाव
    शनिवार

    साईनगर, गजानन नगर, राजीव गांधीनगर, काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागरनगर भाग- दोन, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बुद्रुक (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हगवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगमनगर, बिलाल मशीद परिसर, शिवरायनगर, शांतिनगर सोसायटी, महानंदा.

    रविवार

    टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, कोलते पाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनू मेहतानगर, बधेनगर, खडीमशिन चौक, पिसोळी रस्ता, ईस्कॉन मंदिर, प्रतिभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रुक (काही भाग), पारगेनगर, एच अँड एम सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी, शोभा आयव्हरी सोसायटी, तालाब कंपनी परिसर, सर्वे क्रमांक १५, सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्रमनगर, टायनी इंडस्ट्रियल परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णु ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपूर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *