• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ही एक चूक कराल तर BMC घेणार नाही घरगुती कचरा

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ही एक चूक कराल तर BMC घेणार नाही घरगुती कचरा

म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : ओला, सुका आणि घरगुती कचरा वर्गीकरण करा, अन्यथा कचरा घेण्यास नकार देणार, असा थेट इशारा मुंबई महापालिकेच्या डी प्रभाग कार्यालयाने गृहनिर्माण संस्था आणि चाळींना दिला आहे. शहरातील कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. रहिवाशांकडून कचरा वर्गीकरण केले जात नसल्याने त्याच्या विल्हेवाटीत मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळेच महापालिकेने कचरा वर्गीकरण न करणाऱ्या डी प्रभागातील गृहनिर्माण संस्था, चाळींना इशारा देऊन शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या डी प्रभागात वाळकेश्वर, गिरगाव चौपाटीतील स्वराज्यभूमी, ताडदेव, हाजीअली, मुंबई सेंट्रल आदी परिसरांत मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत. या भागांमध्ये कमीत कमी कचरा निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना विभागस्तरावर ३ मार्चपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या वर्गीकरण मोहिमेचा डी प्रभागाने आता ताडदेव, हाजीअली, गिरगावबरोबरच वाळकेश्वरमधील अन्य परिसरांतही विस्तार केला आहे. वाळकेश्वर परिसरातील नेपियन्सी मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई सेंट्रलमधील बी.आय.टी वसाहत या तीन ठिकाणी गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या तीन परिसरांत २०० वसाहती आहेत. या गृहनिर्माण संस्थांमधून दररोज अंदाजे १० मेट्रिक टन कचरा डंम्पिंग ग्राऊंडवर नेला जातो. हा सर्व कचरा ओला आणि सुका अशारितीने उगमस्थळीच वर्गीकरण करून संकलित करण्याचे काम मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. तसेच येथील सर्व इमारतींनाही कचरा वर्गीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना कचरा वर्गीकरण करणे सक्तीचे केले आहे.

डी प्रभागातील सर्व भागांत कचरा वर्गीकरण करून तो गोळा करण्यासाठी कचरा वाहनेही उपलब्ध आहेत. पाच वाहने ही ओला कचरा आणि दोन वाहने ही सुका कचरा गोळा करण्यासाठी वापरली जात आहेत. या पाच वाहनांतून दररोज एकूण २५ मेट्रिक टन ओला कचऱ्याची वाहतूक केली जाते. तर दोन वाहनातून साधारण तीन ते चार मेट्रिक टन सुका कचरा वाहून नेला जात असल्याची माहिती डी प्रभागातील घनकचरा व्यवस्थापनाचे सहाय्यक अभियंता श्रीकांत राठोड यांनी दिली. कचरा गोळा करण्याआधी त्याचे वर्गीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी डी प्रभागातील गृहनिर्माण संस्थांना, ओला आणि सुका कचरा वेगळा नाही केला, तर तो पुन्हा सोसायटीला परत करतो किंवा घेण्यास नकार देत आहोत. त्यांना कचरा वर्गीकरणाचे आवाहनही करत असल्याचे राठोड म्हणाले. या आवाहनाला अनेक सोसायट्यांनी प्रतिसाद दिला असून शंभर टक्के कचरा वर्गीकरणाकडे पालिकेचा डी प्रभागाची वाटचाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Success Story : नोकरी सोडून भंगारातून कमावले २०० कोटी, पठ्ठ्याच्या छोटाशा स्टार्टअपने चमत्कारच केला…
आणखी १७ ठिकाणीही वर्गीकरण मोहीम

महापालिकेने मार्च महिन्यात आपल्या कार्यक्षेत्रातील तीन ठिकाणी १०० टक्के कचरा वर्गीकरण मोहीम सुरू करून आता त्याचा आणखी विस्तार केला जात आहे. सध्या ताडदेव, हाजीअली, गिरगावबरोबरच वाळकेश्वर आणि मुंबई सेंट्रल परिसरात १०० टक्के कचरा वर्गीकरण मोहीम सुरू केली आहे. डी प्रभागातील अन्य १७ ठिकाणीही टप्प्याटप्यांत ही मोहीम सुरू केली जाणार आहे. ओला कचरा वाहून नेण्यासाठी कचरा वाहनांची कमतरता होत आहे. त्यामुळे कचरा गोळा करणारी आणखी दोन वाहने लवकरच डी प्रभागाकडून ताफ्यात दाखल केली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed