• Sat. Sep 21st, 2024
Video: ओव्हरटेक करण्यावरुन वाद, सिनेस्टाईलने बस अडवली; एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण

अकोला : अकोला जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रस्त्यावर एका खासगी बस चालकाकडून म्हणजेच लक्झरी चालकांने शेगाव आगाराच्या एसटी बस चालकाला मारहाण केली आहे. या प्रकरणात अकोला जिल्ह्यातील बाळापुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितले. दरम्यान शेगाव आगारातून यवतमाळला जाण्यासाठी निघालेल्या शेगाव आगाराच्या बस चालकाला साईड देण्याच्या कारणावरून खामगाव येथील स्वामी ट्रॅव्हल्सच्या खासगी बस चालकाने बेदम मारहाण केली. ही घटना शेगाव ते बाळापुर दरम्यान घडली असून या मारहाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय संपूर्ण प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराची एसटी बस ही प्रवासी भरून यवतमाळकडे निघाली होती. ही बस चालक योगेश गोंडोकार आणि वाहक दीपक चिकडे हे दोघे घेऊन जात होते. दरम्यान, शेगाव बाळापुर मार्गाने जात असताना लक्झरी बस चालक हा महामंडळाच्या एसटी बसला हटकून पुढे जाण्यासाठी साईड देत नव्हता. काही वेळानंतर लक्झरी बसमधील प्रवासी रस्त्यात जवळा फाट्यावर थांबली अन् प्रवाशी उतरविण्यासाठी बस थांबल्याने एसटी चालकानं आपली बस पुढे काढली.
सतेज पाटलांना आता बंटी म्हणणं बंद करा, अजित पवारांनी भरसभेत मुद्दा काढला, कारण सांगितलं
मात्र, तेवढ्यात लक्झरी बस चालकाने आपल्या बसचा वेग वाढवत एसटी बसला ओव्हरटेक करत बस थांबवली. एसटी बस चालकाला म्हणाला की “बस पुढे का नेली?”, असं म्हणून बस अडवून दोघांशी वाद घातला. एसटी चालक योगेश गोंडोकार यांच्यासोबत शाब्दिक वाद सुरू असताना काही प्रवाशांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्झरी बस चालक ऐकायला तयार नव्हता आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

लक्झरी बस चालकाने गोंडोकार यांना प्रचंड माराहण केली असून यामध्ये एसटी बस चालकाच्या एका डोळ्याला दुखापत अन् मेंदूला मार लागलेला आहे. त्यामुळे गंभीर जखमी एसटी बस चालकावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी लक्झरी बस चालकावर आणि वाहकावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले. या प्रकरणात खुद्द पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दखल घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यात अनेक भागात एसटी महामंडळाचे वाहक आणि चालकावर हल्ले होत आहेत. शेगाव आगाराच्याही एसटी चालकावर लक्झरी बस चालकाने हल्ला चढवला. दरम्यान, लक्झरी बस चालकाने एसटी बसच्या चालक आणि वाहक या दोघांनाही कॉलर पकडून खाली खेचलं आणि त्याच्यासोबत असलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीही एसटी चालकाला मारहाण केली आहे.

मारहाणीत एसटी चालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी गेलो असता पोलिसांकडून हवी तशी वागणूक मिळाली नाही. ना वेळीचं शासकीय आरोग्य सुविधा मिळाल्या. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी विदर्भ एसटी कामगार सेनेचे विनोद पोहरे यांनी केली आहे.

जडेजा देत होता रन आऊटची धमकी, डेव्हिड वॉर्नरने केली त्याचीच तलवार स्टाइल नक्कल! पाहा VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed