• Sun. Nov 24th, 2024

    “मेरी लाईफ मेरा स्‍वच्‍छ शहर” उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे – प्रशासक तथा मुख्यधिकारी डाॅ. मृणाल जाधव यांचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2023
    “मेरी लाईफ मेरा स्‍वच्‍छ शहर” उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे – प्रशासक तथा मुख्यधिकारी डाॅ. मृणाल जाधव यांचे आवाहनRRR

    नांदेड -प्रतिनिधी

             केंद्रिय गृहनिर्माण आणि नागरी व्‍यवहार मंञालयाने “मेरी लाईफ मेरा स्‍वच्‍छ शहर” हे अभियान राबविण्‍याचे निर्णय घेतले असुन या अभियानाअंतर्गत नगरपरिषद किनवटच्‍या वतीने रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल सेंटर म्‍हणजेच RRR केंद्र स्‍थापन करण्‍यात येत असून सदरील उपक्रमात शहरातील स्‍वच्‍छताप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्‍याचे आवाहन प्रशासक तथा मुख्यधिकारी डाॅ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
             रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल उपक्रम नगर परिषद क्षेञात दिनांक 20 मे 2023 रोजी ते दिनांक 05 जुन 2023 दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे.नगरपरिषद आणि शहरातील प्रमुख बचतगटांच्‍या सहाय्याने शहरात नगरपरिषद ईमारत आणि छञपती शिवाजी राजे महाराज चौक या दोन ठिकाणी रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल केंद्र स्‍थान करण्‍यात येणार असून सदरील केंद्रामध्‍ये नागरीकांनी वापरलेली जुनी पुस्‍तके, प्‍लास्‍टीक,निरउपयोगी फायबर वस्‍तु, जुने कपडे, पादञाने,प्लास्टीकजन्य वस्तु, लाकडी निरुपयोगी साहित्य इत्‍यादी वस्‍तु तथा घरात असलेली ईतर निरउपयोगी वस्‍तु सदरील रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल केंद्रात जमा करावे. सदरील केंद्रात जमा होणा-या निरउपयोगी वस्‍तुंची पुनर्रवापर,पुनर्रउपयोग होणार असुन या उपक्रमाचा लाभ शहरातील नागरीकांनी घेऊन घरात अथवा परिसरात असलेल्‍या निरउपयोगी वस्‍तु संकलन केंद्रास देऊन किनवट शहर अधिक स्‍वच्‍छ व सुंदर करण्‍यासाठी आपले अनमोल सहकार्य करण्‍याचे असे आवाहन किनवट नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्‍याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे. 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed