• Fri. Mar 13th, 2026
    कर्नाटकातील दगदग भोवली, देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली; सक्तीच्या विश्रांतीवर

    मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले प्रचारदौरे, सभांचा धडाका तसेच गेल्या काही दिवसांत राज्याच्या अन्य भागांत झालेल्या प्रवासाचा ताण यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती मंगळवारी बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेतली. यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकले नाहीत.

    मेच्या पहिल्या आठवड्यात फडणवीस हे कर्नाटकाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तेथील भाजपच्या उमेदवारांसाठी अनेक सभा घेतल्या. कर्नाटकमधील प्रचार आटोपून मुंबईत आल्यानंतर त्यांनी अमरावती, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसह सोमवारी पुणे, पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. रणरणत्या उन्हात झालेल्या दौऱ्यांचा परिणाम फडणवीस यांच्या प्रकृतीवर झाला. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. मंगळवारी मंत्रालयात राज्य मंत्रीमंडळाची बैठक होती. या बैठकीस फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ही बैठकही लवकर संपविण्यात आल्याचे समजते.

    महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेला; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

    भाजपचे मिशन मुंबई

    बई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून निवडणुकीची तयारी आणि वातावरणनिर्मितीचा एक भाग म्हणून मुंबई भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मुंबईत दौरा आयोजित केला आहे. नड्डा हे आज, बुधवारी मुंबईत येत असून मुंबईचा दौरा आटोपल्यानंतर ते गुरुवारी पुण्यात आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

    मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गेल्या काही महिन्यांपासून भाजपने कार्यक्रमांची आखणी करायला सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय नेत्यांचे मुंबई दौरे आयोजित केले जात आहेत. त्यानुसार नड्डा हे पुढील दोन दिवस मुंबई, पुण्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई भाजप मध्यवर्ती समितीच्या नेत्यांशी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत नड्डा हे पुण्यात राज्यातील खासदार-आमदार तसेच राज्य मंत्रीमंडळातील तसेच, राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत.

    Devendra Fadnavis In Pune: राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील, देवेंद्र फडणवीसांकडून संकेत

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नड्डा यांच्या दौऱ्याची माहिती दिली. त्यानुसार नड्डा यांचे बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. यावेळी त्यांचे भव्य स्वागत केले जाईल. सायन-पनवेल मार्गावर देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नड्डा यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे केंद्रीय योजनांच्या लाभार्थी संवाद, रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते रमाबाई नगरमध्ये पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी दुपारचे भोजन घेतील, अशी माहिती शेलार यांनी दिली.

    सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार

    याशिवाय बोरिवली येथील अटलस्मृति उद्यानात विविध क्षेत्रातील बुद्धिवंतांशी संवाद, चारकोप येथे पन्ना प्रमुख बैठकीत सहभाग, मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडीप्रमुखांशी संवाद असे विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. रात्री नड्डा यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर असेल. येथे नड्डा हे मुंबई भाजपच्या मध्यवर्ती समितीची बैठक घेतील. त्यानंतर गुरुवारी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद, युवक संवाद या कार्यक्रमांतही सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते प्रभादेवी येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत. तसेच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनालाही भेट देणार आहेत. मुंबईतून पुण्याला जाण्यापूर्वी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. गुरुवारी पुण्यात भाजपची प्रदेश कार्यसमितीची बैठक होत आहे. प्रदेश कार्यकारिणीचे सुमारे दीड हजार सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    शिंदे गटाचा पोपट मेलेला आहे; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed