अडीच किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी आम्ही एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले. त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले. होमिओपॅथीचे विविध औषधांचा वापर केला. देशात प्रथमच अडीच किलोचा आंबा उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना दाखवले, असे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी माहिती देताना सांगितले.
बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती अग्रिकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला. मागील ४-५ वर्षांपासून बारामती KVK येथे तेथील वैज्ञानिक यांचे निरीक्षणाखाली शेतीमध्ये पिकावर होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापराचा अभ्यास करण्यात आला. राजेंद्र पवार आणि डॉ. वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने पिकावर होमिओपॅथी औषधांचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि अडीच किलो वजनी आंब्याचे भरघोस उत्पादन केले. बारामती कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी आज सकाळी आंबा महोत्सवाला भेट दिली. आणि अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार यांचे नाव देत शरद मँगो, असे नामकरण केले.
पिकांच्या उत्पादनवर होमिओपॅथी मेडिसिनचा वापर
गुलबर्गा विद्यापीठाचे होमिओपॅथिक मेडिसिनचे पदवीधारक डॉ. वीरेंद्रकुमार पाटील हे गेल्या तीस वर्षांपासून होमिओपॅथिक औषधी पद्धतीवर संशोधन करीत आहेत. त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी पिकांवर होमिओपॅथी औषधांचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासात फक्त लॅबोरेटोरीचा उपयोग नसून सगळ्या पिकावर याचे कसे परिणाम होतात यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती अग्रिकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेतला. मागील ४-५ वर्षांपासून बारामती KVK येथे तेथील वैज्ञानिक यांचे निरीक्षणाखाली शेतीमध्ये पिकावर होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापराचा अभ्यास करण्यात आला. राजेंद्र पवार आणि डॉ वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने पिकावर होमिओपॅथीचा वापर करणे प्रयोग यशस्वी झाला. बारामती कृषी विज्ञान केंद्रात ढोबळी मिरची सह तूर, गह, हरभरा, मेथी, मका, धने, टोमॅटो या पिकावरही होमिओपॅथी औषधांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. हरभऱ्यावरील घाटे अळीवर नियंत्रण हे होमिओपॅथी औषधांनी सहज शक्य झाले आहे.