• Sat. Mar 14th, 2026

    आईला चहाच्या टपरीवर सोडलं, अंघोळीसाठी घरी परतला अन् मग त्याने जे केलं… जळगाव सुन्न

    आईला चहाच्या टपरीवर सोडलं, अंघोळीसाठी घरी परतला अन् मग त्याने जे केलं… जळगाव सुन्न

    जळगाव: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाने सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आकाश सुरेश शेरे (वय-१९ रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही.जळगावातील सुप्रीम कॉलनीत आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. आकाश हा एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता आकाशने त्याच्या आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी अंघोळ करण्यासाठी आला. यादरम्यान त्याने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    Crime News: पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत
    मुलगा टपरीवर आला नाही म्हणून आई घरी गेली अन् मुलाला पाहून तिने हंबरडाच फोडला

    आकाश हा टपरीवर का आला नाही म्हणून आई सविता या घरी आल्या. घरात जाताच आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहून आईने एकच हंबरडा फोडला होता. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक आणि तरुणांनी धाव घेतली. तसेच, मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.

    मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

    याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. आकाशने आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. मृत आकाश याच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
    धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed