• Mon. Nov 25th, 2024
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार

    मुंबई : ‘मुंबईतील सागरी किनारा मार्गास (कोस्टल रोड) छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येईल,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. कोस्टल हायवेच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

    शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले आहेत, त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नोंदवले.
    मुंबईच्या समुद्रातून सुरमई, रावस गायब; ‘या’ माशांच्या आगमनामुळे महत्त्वाचे संकेत, मासेमारीचा सिझन लवकर संपणार?
    छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळात १२० लढाया लढल्या, मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. तसेच जगात कुठेही नसतील असे जलदुर्ग त्यांनी बांधले. हीच प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्राला स्थान दिले असल्याचंही शिंदे यांना सांगितलं. तसेच त्यांच्या आठवणी जपण्यासाठी, खाणाखुणा जपण्यासाठी कितीही प्रयत्न केला तपी त्यांच्या त्या कतृत्वासमोर आणि शौर्यासमोर त्या छोट्याच ठरतील, असं देखील ते म्हणाले आहेत.

    Raj Thackeray : भाजप नेत्यानं अस्तित्वाचा मुद्दा काढला,राज ठाकरेंकडून छोटी माणसं म्हणत किमान शब्दात कमाल अपमान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed