नंदुरबार: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या आईवर मुलाने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत मुला बरोबर त्याच्या मामेभावाने देखील या महिलेवर हल्ला केला असून तिला जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातुन समोर आली आहे. या प्रकरणी जखमी आईने मुलगा आणि भाचा या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धजापाणी येथे गुरुवारी मुलाने आईला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जेरमीबाई बारक्या वळवी असे वृद्ध महिलेचे नाव आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला तळोद्याच्या धजापाणी येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री या महिलेकडे तिच्या मुलाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मुलाने आणि भाच्याने मिळून या मातेला जखमी केले. तिचा मुलगा २५ वर्षीय दयानंद बारक्या वळवी याच्यासोबत त्याचा मामेभाऊ श्रावण लेहऱ्या वळवी हा गुरुवारी रात्री घरी आला होता.
धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…मुलगा दयानंद याने दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली परंतु जेरमीबाई यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने भाचा श्रावण याने लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण केली त्यावेळी सोबत असलेला मुलगा दयानंदने आईला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांच्या समोर आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघेही घटनास्थळा वरून निघून गेले.
जुनी पेन्शन मिळेल न मिळेल पण या ताईंचं भाषण फुल्ल गाजतंय; आमदार, खासदारांवर तुफान फटकेबाजी
याप्रकरणी जेरमीबाई यांनी तळोदा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून २५ वर्षीय दयानंद वळवी आणि २६ वर्षीय श्रावण वळवी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक निलेश खोंडे करीत आहे.
स्वयंपाक करताना ठिणगी उडाली, अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी, एकाच कुटुंबातील तिघांनी जीव गमावला