• Sat. Sep 21st, 2024
हॅलोss मी डॉ. जोशींची पत्नी बोलतेय! पुण्यात पैसे लुबाडण्याचा नवा पॅटर्न, वाचा नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खून, दरोडा, सायबर क्राईमसह आता फसवणुकीचे प्रकार देखील वाढताना दिसत आहेत. नुकतेच नगर रस्त्यावर आपण डॉ.कुलकर्णी असल्याचे भासवत अनोळखी महिलेने एकाला तब्बल दोन लाखांना गंडवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. त्यामुळे डॉक्टर महिला असल्याचं भासवत फसवणूक करण्याचा नवीन प्रकार शहरात सुरु झाला आहे का ? अशी शंका उपस्थित होत आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपण डॉ.जोशी यांची पत्नी बोलत असल्याचं सांगून एका औषध विक्रेत्याला दहा हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत मुकेश वालचंद जैन (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विश्वासात घेतलं, शेअर मार्केटच्या नफ्याचे अमिष दाखवलं, बारामतीत ४० लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील लेक टाऊन येथे जैन यांचे एम जे. सर्जीकल मेडीकल असून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलने संपर्क साधला. आपण डॉ. जोशी यांची पत्नी बोलत असल्याचे महिलेने सांगितले. कंबरेचा पट्टा आणि वॉकर सातारा रस्त्यावरील रुग्णालयात पाठवून द्या असं त्या महिलेने सांगितले. माझ्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहे. त्याबदल्यात तुम्ही मला पाचशे रुपयांच्या नोटा द्या, असे महिलेने सांगितले.

गॅस शेगडी बिघडलीय? दुरुस्ती करायला कोणाला बोलवत असाल तर सावधान; कळव्यात महिलेची फसवणूक

त्यानंतर जैन यांनी आपला कामगार रवींद्रकुमार याला कंबरपट्टा, वॉकर आणि दहा हजार रुपये घेऊन रुग्णालयाच्या परिसरात पाठविले. त्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात एकजण रवींद्रकुमार यांना भेटला. डॉ. जोशी यांच्या पत्नीने मला पाठविले आहे. तुमच्याकडील दहा हजार रुपयांची रोकड मला द्या. मी मॅडमकडून पैसे घेऊन येतो, असे सांगून त्याने रवींद्रकुमार याच्याकडून दहा हजार रुपये घेतले. बराच वेळ झाला तरी पैसे घेऊन गेलेला आरोपी परत आला नाही. तेव्हा रवींद्रकुमार रुग्णालयात गेला. तेव्हा पैसे घेऊन गेलेली व्यक्ती पसार झाल्याचे उघडकीस आले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed