जालना : जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील ३० वर्षीय संजय अंकुश पवार आणि त्याची २७ वर्षीय पत्नी संगीता पवार या दोघांमध्ये घरगुती वादातून नेहमी भांडण होत होती. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा दोघात वाद पेटला. रागाने बेफाम झालेला संजय पवार हा पत्नी संगीताला घराचा दरवाजा आतून बंद करून मारहाण करू लागला. त्याने संगीता हिच्या डोक्यात लोखंडी पहारीचे वार केले. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. या नंतर त्याने शेतात जाऊन दोरखंडाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.घरात हे थरार नाट्य चालू असताना त्यांची ८ ते ५ वर्षे वयोगटातील ३ मुले गावात खेळत होती. संगीताला मारहाण सुरू असताना शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी आवाज देऊन दार उघडण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र संजय हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे भयानक कृत्य करून तो घराबाहेर निघून गेल्यावर नातेवाईकांनी घरात पाहिले असता हे भयानक हत्याकांड दिसून आले. लगोलग ही बातमी गावात पसरली.
घरात पाण्याची मोटार लावणे जीवावर बेतले, विजेचा धक्का लागला, १४ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघाही मयतांचे मृतदेह स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत.मुख्यमंत्री शिंदे श्री रामाच्या वेशभूषेत, झळकला बॅनर, ठाण्यात दक्षिण भारतीयांचे समर्थन
या भयानक घटनेने साऱ्या गावावर शोककळा पसरली असून आई बापाच्या छत्राला मुकलेल्या तिन्ही मुलांबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.
फोन पेवर पैसे पाठवताना २ ऐवजी ३ नंबर दाबला; एकाने घेतला महिलेचा गैरफायदा, महिला हादरली