• Sun. Sep 6th, 2026
वकील होण्याचं स्वप्न अधुरं, रॅगिंगला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवलं; घटनेनं पुणे हादरलं

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ-कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने रँगिंगला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांविरोधात चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज रावसाहेब गर्जे, असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राजचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे. निरूपम जयवंत जोशी याच्याविरूध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज आणि निरूपम यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास मानसिक त्रास देत होता. वेळोवेळी होणार्‍या त्रासाला कंटाळून राजने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांना, पण तो निर्णय काय, हे न्यायालयाने अप्रत्यक्ष सांगितलं, परबांनी कॉपीच वाचून दाखवली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed