संदीप काळे (वय ३३) , राहुल कोलते (वय २८ ) हे दोघे नांदेड शहरातील चौफाळा भागातील पंचशील नगर येथील रहिवासी आहेत. गुरुवारी दुपारी दोघ जण बुलेट वरून भोकर ला लग्नाला गेले. लग्न लावून परत ते दोघ भोकरहून नांदेडकडे परत निघाले होते.नांदेड- बारड रोड वरील खैरगाव पाटीजवळ आले असता भोकर फाट्याकडून बारडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकी धडक दिली.अपघात एवढा भीषण होता की बुलेट फरकटत गेली आणि दोन्ही तरुण ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक आणि बारडचे पोलीस उपनिरीक्षक हानुमंत कवले घटनास्थळी दाखल झाले. ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. बारड पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शव विच्छेदनानंतर दोघांचे पार्थिव उशिरा राहत्या घरी आणण्यात आले. कुटुंबियांसह नाटेवाईकांना आश्रू अनावर झाले होते. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
दोघांची एकाच गल्लीतून अंत्ययात्रा
अपघातातील संदीप काळे आणि राहुल कोलते हे जिवलग मित्र सोबतच शेजारी देखील होते. कुठेही जायायचं असेल तर दोघं सोबत जातं होते. मात्र, त्यांच्यावर नियतीने घात केला आणि दोघांची अंत्ययात्रा एकाच गल्लीतून काढण्यात आली. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलं आहे. वेगाने वाहने देखील चालवली जातं आहे. मागील काही महिन्या पासून या मार्गांवर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत. आठवड्यातून एक ते दोन वेळेस या मार्गांवर छोटे मोठे अपघात घडत आहेत.