गोकुळच्या लेखापरीक्षणमधून काय समोर येईल ते लवकरच समजेल
गोकुळचे शासकीय लेखापरीक्षण होऊ नये यासाठी सत्ताधारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. याबाबत धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघ हे सर्वसामान्यांची जीवनदायीनी आहे. या दुधाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला पैसा मिळत असल्याने कोणत्याही शेतकऱ्याची येथे आत्महत्या झाली नाही. मात्र, गेल्या दीड वर्षापासून हा संघ विरोधकांच्या ताब्यात गेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे कारभार सुरू असल्याचे दिसून आल्याने संचालिका शौमिका महाडिक यांनी लेखापरीक्षणाची मागणी केली. मात्र हे ऑडिट होण्यासाठी सत्ताधारी सर्व नेते मंडळी आणि संचालक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत विनवण्या केल्या. त्यात यश मिळत नसल्याचे पाहून ते उच्च न्यायालयात गेले आणि स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत लेखापरीक्षणास मान्यता दिली. यामुळे यामधून काय समोर येईल ते लवकरच समजेल. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तसेच दुधाची क्वालिटी ढासळत असून गोकुळ ब्रँडचा दर्जाही कमी होत आहे, अशी टीका धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर केला आहे.
