• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai Crime: आई शेजाऱ्यांकडे गेली, भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्…; २२ वर्षीय तरुणाचं क्रूर कृत्य

    डोंबिवली : डोंबिवलीत एक धक्कादायक घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. सदर हकीकत समजताच पीडित मुलीच्या आईने त्वरीत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी भा.द.वि कलम ३५४ बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा केला. कुंदन ( वय 22) असे सदर आरोपीचे नाव असून तो आजमगडचा रहिवासी आहे.Weather Alert : मोचा चक्रीवादळामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा, पुढचे ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट
    काय आहे प्रकरण…

    शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलीची आई ही शेजाऱ्यांकडे गेली होती. यावेळी आईने मुलाला आणि मुलीला सांगितले की तुम्ही पाठून या. मग भाऊ आपल्या बहिणीला घेऊन जात असतानाच आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला हात पकडून घरी आणले. ही बाब लगेच त्याने आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने त्वरीत घराकडे धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा हा उघडा होता तर कुंदन याच्या घराचा दरवाजा हा बंद असल्याने त्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर त्यांच्या मुलीने रडत रडत घराचा दरवाजा उघडला. पीडित मुलीच्या आईने मुलीला घरात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काय झाले का ? याची विचारणा केली असता. पीडित मुलीने कुंदन हा तिला घरात घेऊन गेला, यावेळी तिचा भाऊ देखील होता. पीडित मुलीच्या भावास त्याने शिवीगाळ करत तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला.

    Jalgaon Crime: तरुणीने भर रस्त्यात तरुणावर सपासप फिरवला चाकू, घटनेचा VIDEO व्हायरल
    दरम्यान, हकीकत समजताच पीडित मुलीच्या आईने त्वरीत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आशा निकम व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी आरोपी कुंदन याचा शोध घेत रविवारी मध्यरात्री त्याला डोंबिवलीतून अटक केली आहे.

    मुलांना खोलीत डांबलं, रोज सिगारेटने प्रायव्हेट पार्ट जाळले अन्…; प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या क्रूरतेने खळबळ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed