• Mon. Nov 25th, 2024
    शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा महाराष्ट्रात! उंची ३२ फूट, वजन १० हजार…

    नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने महाराजबाग परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा बसवणार आहे. विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लोकसहभागातून विद्यापीठाच्या महाराज बाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येत आहे. ही मूर्ती कांस्य धातूची असून महाराष्ट्र शासनाच्या कला विभाग आणि संचालनालयाने रीतसर मान्यता दिलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक हा भारतासह जगात मानवतावादी लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळेच राज्याभिषेकाची आठवण करून देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा लोकांच्या मनात मानवतावादी दृष्टिकोन रुजवण्याची प्रेरणा देणारा आहे.

    यासंदर्भात माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष मुधोजी राजे भोसले, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश ड्यूके, सहसचिव तथा संस्थापक प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजय शेंडे, प्राचार्या प्रवीणा खोब्रागडे आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी समितीच्यावतीने लोकसहभागातून शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने मान्यता दिली आहे. हा जगातील सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा असेल. स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, इतिहास

    पुतळ्याचे वजन १०,००० किलो असेल

    संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांसाठी प्रगत शिक्षण केंद्रे उपलब्ध करून दिली जातील. या शिक्षण केंद्रात शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. ही समिती उजळणी व्याख्याने, परिसंवाद इत्यादींचे आयोजन करून एक पुस्तकही तयार करेल. पुतळ्याचा चाबुतराची लांबी २० फूट आणि उंची ९ फूट तर रुंदी १५ फूट असेल असेल. सिंहासरूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असेल. यावर छत्री ७ फुटांची असेल. कांस्य धातूपासून बनवलेल्या मूर्तीचे वजन १०,००० किलो असेल. मूर्तीकार सोनल कोहाड यांच्या हस्ते हा पुतळा तयार करण्यात येणार आहे.

    आठवीत शिकणाऱ्या मुलीनं धाग्यातून शिवराय साकारले; अमोल कोल्हेंनी केला व्हिडिओ शेअर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed