• Sat. Sep 21st, 2024

बहिणीची भेट, मग मित्राच्या मावशीकडे जात होते, तेवढ्यात ३ मित्रांना ट्रकची धडक अन् अनर्थ घडला

बहिणीची भेट, मग मित्राच्या मावशीकडे जात होते, तेवढ्यात ३ मित्रांना ट्रकची धडक अन् अनर्थ घडला

छत्रपती संभाजीनगर: भरधाव वेगात जाणार्‍या गॅस सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रकने ट्रिपल सीट जाणार्‍या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास चिकलठाणा बाजार तळासमोर घडला. अपघात एवढा भीषण होता एका मित्राचा मृत्यू झाला तर दोघं गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमली होती यावेळी पोलिसांनी गर्दी बनवण्याचं काम केलं.या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सतिष बडदे (१९ रा. शेवगाव ता शेवगाव जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, भगवान अप्पासाहेब गोरे (२४), सद्दाम जानुभाई शेख (२१ दोघेही रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय हा छोट्या मालवाहु गाडीचा चालक असून तो शेवगाव वरून सकाळी शहरात मालवाहु गाडी घेऊन आला होता. अक्षयचे मित्र भगवान गोरे, सद्दाम शेख हे दोघेही सकाळी विविध कामानिमित्त शहरात आले होते.

Husband Killed Wife: पत्नीला माहेरुन आणून दुसऱ्याच दिवशी संपवलं, डोळे बाहेर काढले, अन्… लव्ह मॅरेजचा भयंकर अंत
अक्षयने त्याची गाडी उभी करून ते भगवानच्या बहिणीला भेटण्यासाठी चिकलठाणा परिसरात आले होते. बहिणीची भेट घेतल्यानंतर भगवान गोरे याची दुचाकी एम एच १६ डीबी ५६९८ ने बिडकीनला अक्षयच्या मावशीकडे जाण्यासाठी निघाले. चिकलठाणा बाजारतळासमोर गॅस सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रक एम एच २२ एन २८८८ ने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात अक्षय हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर सद्दाम आणि भगवान हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरीकांनी त्यांना तात्काळ घाटी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी ट्रक चालकाविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

समृद्धी महामार्गावर ट्रकला अपघात, बिअरचे बॉक्स घेण्यासाठी तरुणांपासून वृद्धांची गर्दीच गर्दी!

हा बघा तेवढा भीषण होता की तिघेही तरुण गंभीर जखमी झाले. दरम्यान नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच रस्त्यावर लोकांनी आरडाओरोड केला. मोठी घटना घडल्यामुळे घटनास्थळी बघायची मोठी गर्दी जमली. दरम्यान, ही माहिती पोलिसांना मिळताच घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी पांगवण्याचे काम केलं.

आई फोन घेईना, मुलगी घरी बघायला गेली तर धक्काच बसला, डोंबिवलीत फ्लॅटमध्ये भयंकर दृष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed