गेल्या काही दिवसांपासून परिसरात अवकाळी पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतातील कांदा पावसात भिजू नये यासाठी रामालाल हे सकाळीच शेतातील कांदा साठवण्यासाठी आणि नियमित शेताची काम करण्यासाठी मोपेड एम.एच २० डी.डब्ल्यू ८२०८ ने घरून शेताकडे निघाले होते.
मलावडा फतियाबाद रोडवर जात असताना रामालाल यांच्या मोपेडला भरधाव चारचाकी वाहन क्र.एम.एच.२० ए.जी. ९३८६ वाहनाने जोराची धडक दिली.या अपघातात रामलाल यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात एवढा भीषण होता की रामलाल यांच्या चारचकीचा समोरच्या भागाचा अक्षारश चुराडा झाला. या अपघातानंतर घटनास्थळी बघायची मोठी गर्दी झाली होती. रामलाल यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.रामलाल पल्हाळ यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
रामलाल पल्हाळ हे माजी ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली.दोनही वाहने घटनास्थळी असून याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.घटनेमुळे रामलाल पल्हाळ यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अवकाळी पावसानं मोठं नुकसान
अवकाळी पावसानं महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठं नुकसान झालं आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून उन्हाळी हंगामातील शेतीचं देखील नुकसान झालंय.