• Mon. Nov 25th, 2024

    नवी मुंबईत मेट्रोएवजी धावणार मेट्रो निओ, स्टँडर्ड गेज मेट्रोऐवजी सिडकोने निवडला नवा पर्याय

    नवी मुंबईत मेट्रोएवजी धावणार मेट्रो निओ, स्टँडर्ड गेज मेट्रोऐवजी सिडकोने निवडला नवा पर्याय

    नवी मुंबई : नवी मुंबईत आता मेट्रो-१ चे काम (बेलापूर ते पेंधर) पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. परंतु नवी मुंबईत सिडकोद्वारे भविष्यात साकारल्या जाणाऱ्या मेट्रोचा प्रवास आता अधिक सुखमय आणि आरामदायी करताना नव्या सुधारित पद्धतीसह मेट्रो लाइन क्रमांक २, ३ आणि ४ ची अंमलबजावणी करण्यास सिडकोने मान्यता दिली आहे. स्टँडर्ड गेज मेट्रोच्या जागी मेट्रो- निओ या नव्या वाहतुकीच्या पर्यायाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.मेट्रो-निओ ही एक नावीन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था असून २० लाखांपर्यंतलोकसंख्या असलेल्या शहरांसाठी विकसित केलेली वाहतूक सेवा आहे. ही सुलभ, जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर असून मेट्रो निओ प्रवाशांना मेटोसेवेसारख्याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्याप्रवासाची अनुभूती देईल, असा विश्वास मुखर्जी यांनी व्यक्त केला. मेट्रो-निओचे डबे पारंपरिक मेट्रो ट्रेनपेक्षा लहान आणि वजनाने हलके असणार आहेत. मेट्रो-निओ ही एक अत्याधुनिक, आरामदायी, ऊर्जा कार्यक्षम, कमीत कमी ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणपूरक प्रणाली असणार आहे. भारतातील एक नावीन्यपूर्ण प्रकल्प ठरणारा नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा मेट्रो- निओ एमआरटीएसचा एक भाग म्हणून विकसित केला जात असल्याचे डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

    Manipur Violence: कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, मुलाच्या फोनने वडील हादरले, पवारांनी सूत्रे हलवली आणि…
    राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत वेगाने उभे राहात आहे. पुढील वर्षी या विमानतळावरुन पहिले उड्डाण होईल असे अपेक्षित आहे. त्यामुळे या विमानतळाच्या चारही बाजूने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. त्याचा आराखडा तीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आला असून मुंबईतील मानखुर्दपुढे नवी मुंबईत सर्व उपनगरांना जोडणारी रेल्वे सिडकोच्या आर्थिक सहाय्यावर धावत आहे.

    रेल्वेनंतर मेट्रोच्या चार मार्गाची उभारणी करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१० मध्ये घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी मे २०११ रोजी बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग शुभारंभाने करण्यात आली आहे. पहिल्या चार वर्षांत धावणारी या मार्गावरील मेट्रो सध्या रखडली आहे पण या मार्गाचे काम आता अंतीम टप्यात आले असून केवळ उदघाटनाच्या प्रतिक्षेत हा मार्ग आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रखडलेल्या या प्रकल्पाला चालना दिली आहे.

    Rajouri Encounter: जम्मू-काश्मिरात IED स्फोटात ५ जवान शहीद, चकमकीत अनेक अतिरेकी ठार
    बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गानंतर तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर रेल्वे स्थानक, पेंधर ते तळोजा एमआयडीसी, आणि खांदेश्वर ते नवी मुंंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा एकूण २७ किलोमीटर लांबीच्या चार मेट्रो मार्गाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मात्र हा मार्ग स्टॅंडर्ड गेज प्रमाणे न उभारता मेट्रोनिओ धर्तीवर उभारला जाणार आहे. देशातील पहिली मेट्रोनिओ प्रकल्प हा नाशिक मध्ये साकारण्यात आला असून ही मेट्रो ओव्हरहेड ट्रॅक्षन पध्दतीवर चालविली जाणार असून यातील बस ह्या रबर टायर वरील आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रीक ट्रॉलीच्या राहणार आहेत.

    मोठी बातमी! दिल्ली पोलिसांनी गीता फोगट आणि तिच्या पतीला घेतले ताब्यात, जाणून घ्या मुख्य कारण
    मेट्रो निओची वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक

    मेट्रो निओचे डब्बे हे मेट्रोच्या डब्यांपेक्षा आकाराने लहान व वजनाने हलके असणार आहेत. ही वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक असल्याने सिडकोने यानंतरचे मार्ग या पध्दतीने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे मानखुर्द पर्यंत येणार आहे. रेल्वे प्रमाणेच त्यापुढे सिडको नवी मुंबईतील मेट्रो उभारणार असून हा मार्ग नवी मुंबई विमानतळाला जोडला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed