• Sat. Sep 21st, 2024

कारला वाचवताना जोरात ब्रेक, नव्याकोऱ्या गाड्या नेणारा कंटेनर पलटी, पुणे-नाशिक हायवेवर अपघात

कारला वाचवताना जोरात ब्रेक, नव्याकोऱ्या गाड्या नेणारा कंटेनर पलटी, पुणे-नाशिक हायवेवर अपघात

मंचर, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या भोरवाडी गावाजवळ आज सकाळच्या सुमारास कंटेनर पलटी झाला. स्पीड ब्रेकर असल्याने पुढे असलेल्या कारने अचानक ब्रेक मारला. यावेळी त्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या कंटेनर चालकानेही वेग नियंत्रित न झाल्याने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे कंटेनर रस्त्यातच पलटी झाला. यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.हा कंटेनर नवीन चारचाकी गाड्या घेऊन चाकण येथून नाशिकच्या दिशेने निघाला होता. या अपघातात कोणीही मृत अथवा जखमी झाले नाही. मात्र कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने वाहतूक कोंडीचा मात्र सामना करावा लागला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाकण औद्योगिक वसाहतीतून संबंधित कंटेनर नाशिक मालेगावकडे निघाला होता. खेड घाट पास करून पुढे आल्यावर भोरवाडी हद्दीत असलेल्या पुलाजवळ भरधाव वेगाने एक कार जात होती. मात्र रस्त्यावर स्पीड ब्रेकर असल्याचे पाहून कार चालकाने ब्रेक दाबला.

Bhiwandi News : हसऱ्या चेहऱ्यांची अकाली एक्झिट, खेळताना पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत
कारच्या मागून येणारा कंटेनर क्र. एम एच ४७ सी २३१८ हा वेगात येत होता. त्यामुळे कारला वाचविण्याच्या नादात कंटेनर चालकाने कंटेनर उजवीकडे ओढल्याने तो जागेवरच पलटी झाला. त्यामुळे नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

समृद्धी महामार्गावर ट्रकला अपघात, बिअरचे बॉक्स घेण्यासाठी तरुणांपासून वृद्धांची गर्दीच गर्दी!

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ते कंटेनर रस्त्यातून बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत होते. तर काही कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागले होते. एका बाजूने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Wife Murder : जेवताना वाजलं, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं, बॉडी बाथरुममध्ये ठेवली अन्…
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, हवालदार तुकाराम मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गवारी, कारभळ, हवालदार हेमंत मडके, जयवंत कोरडे, भीमा आहेर आणि पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाचे काम पाहिले. कंटेनर दुपारी रस्त्यावरून बाजूला घेण्यात यश आले. त्यानंतर पुणे नाशिक रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed