• Sat. Sep 21st, 2024

जनतेच्या मनाचा दाखला, निर्णय मागं घेण्याची कार्यकर्त्यांची विनंती, शरद पवार काय करणार?

जनतेच्या मनाचा दाखला, निर्णय मागं घेण्याची कार्यकर्त्यांची विनंती, शरद पवार काय करणार?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुंबईतील आपल्या राजकीय आत्मकथा असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच वादळ आले आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांनी पवारांसमोरच आंदोलन करत आपला निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. तब्बल सहा तास सुरु असलेल्या या राजकीय नाट्यावर अखेर मला विचार करायला २-३ दिवस द्या, असा निरोप कार्यकर्त्यांना पाठवत पडदा पाडला.

मात्र, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात पवारांना आपला निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु केले. पुणे, बुलढाणा, धाराशिव येथे तर राजीनामा सत्र देखील सुरु झाले. त्यानंतर अजूनही राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी दबाव वाढत आहे. पुण्यात यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात येत आहे.

शरद पवारांना कार्यकर्त्यांची विनंती

शरद पवारांना कार्यकर्त्यांची विनंती

‘साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. आज महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. साहेब कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी…’ अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर चिटणीस अमित खानेकर यांनी लावले आहेत.
गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल कुणी केला? पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
शरद पवरांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी शरद पवारांवर दबाव वाढत आहे. त्यामुळे शरद पवार कार्यकर्त्यांच्या दबावानंतर आपला निर्णय बदलतात का आपल्या निर्णयावर ठाम राहतात यावर राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडणार आहेत.
शरद पवार निर्णयावर ठाम राहिल्यास अध्यक्षपद कुणाला मिळणार; दोन नावं चर्चेत, अजित पवारांंकडे कोणती जबाबदारी?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

Railway News : मुंबईहून पुणे, नाशिकला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! घाटात नो ब्रेक, रेल्वेगाड्यांचा वाढणार वेग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed