• Sat. Sep 21st, 2024

ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्गावर साजरा होणार यंदाचा नौदल दिन, पंतप्रधान, राष्ट्रपतीही उपस्थित राहणार

ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्गावर साजरा होणार यंदाचा नौदल दिन, पंतप्रधान, राष्ट्रपतीही उपस्थित राहणार

Indian Navy Day Is Celebrated On Sindhudurg Fort: ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्गावर ४ डिसेंबरला यंदाचा नौदल दिन भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.

 

sindhudurg fort
म. टा. वृत्तसेवा, सिंधुदुर्गः मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून मान्यता असणाऱ्या ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्गावर ४ डिसेंबरला यंदाचा नौदल दिन भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्य़ाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गात होणाऱ्या या कार्यक्रमात ७० लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमार व सागरी सुरक्षेला प्राधान्य दिले होते. व्यापारी, चाचे आणि ब्रिटिशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी गडांची गरज असल्याचे शिवरायांनी जाणले आणि त्यातूनच अभेद्य असा सिंधुदुर्ग बांधला. नौदल दिनानिमित्त हिंदुस्थानी नौदलाच्या सामर्थ्याचे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गाच्या समुद्रात होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१मध्ये झालेल्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला करून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले होते. त्यानिमित्त दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदलातर्फे विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed