धुळे: राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशात शेतकरी हातातोंडाशी आलेलं पिक गमावल्यामुळे हैराण झाले आहेत. घराची, दुकानांची अवस्था दैननीय झाली आहे. प्राण्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. साप, अजगर रस्ते आणि घरांमध्ये दिसून येत आहेत. असाच एक भयानक महाकाय अजगरचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो एक अख्खी बकरी गिळंकृत करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना घाम फुटला. तब्बल ८ फुटांचा हा अजगर एक भली मोठी बकरी गिळंकृत करताना पाहून तिथे उपस्थित चांगलेच घाबरले होते.एका महाकाय आठ फुटाच्या शक्तिशाली अजगराने एक बकरीची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही दृश्य विचलित करणारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अजगराने एका बकरीला फस्त केल्यानंतर तो दुसऱ्या बकरीला गिळत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अजगराचं पोट फुगलेलं दिसतंय. या ८ फूट अजगराने संपूर्ण बकरी गिळल्यानंतर तो दुसऱ्या बकरीचा शिकार करण्याचा तयारी होता.
इतका उष्मा की एसीशिवाय जिवंत राहाणं अशक्य, घरात सापडताहेत मृतदेह…
पाहा व्हिडिओ –
हा धक्कादायक व्हिडिओ महाराष्ट्रातील धुळे शहरातला आहे. धुळे शहरातील नकाने तलाव परिसरातमध्ये हा अजगर आढळून आला. त्या परिसरातील जिमखाना जवळ अजगर बकरीची शिकार करताना स्थानिक नागरिकांना दिसला. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी ताबडतोब धुळे शहरातील सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.रिक्षात शिरला ५ फुटी अजगर, चालकासह प्रवाशांची तारांबळ
पोटात बकरी असल्याने हा महाकाय अजगराला हालचाल करणं कठीण झालं होतं. दरम्यान, सर्पमित्रांनी अजगराला काही वेळच्या कसरतीनंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यश आल आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’शी बोलताना दिली.
तोंडात कपडा घातला, केमिकलने जाळलं, गळा आवळला; पोटच्या पोरीसोबत बापाचं भयंकर कृत्य, कारण काय?