पुणे: पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायर ब्रँड नेते वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पेन्शनसाठी २१ वर्षे सरकारदरबारी खेटे मारणाऱ्या आजींना पेन्शन मिळवून दिली. त्यामुळे त्यांच्या कामाचे चांगले कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा वसंत मोरे चर्चेत आले आहेत. नदी बचाव करण्यासाठी चिपको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. त्यात वसंत मोरे हे देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यांच्या चर्चा झाली त्यांच्या पेहेरावाची. या आंदोलनात सहभागी होत त्यांनी चक्क मोराचा पेहराव केला होता. त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.पुण्यातील पर्यावरण प्रेमी हजारोंच्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. संभाजी उद्यान येथून ही रॅली सुरू झाली झाली. जंगली महाराज रस्त्यावरील पादचारी मार्गाने ती नदीपात्राच्या मार्गे खिल्लारे वस्तीपर्यंत आली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नियोजित नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला.
पत्नीने केस ठोकून वारंट काढायला लावले; वैतागलेल्या पतीने पत्नीला सांगून उचलले टोकाचे पाऊल
नदी सुधार प्रकल्पामुळे नदीपात्रातील अनेक झाडे तुटणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी ही रॅली काढली असल्याचे सांगितले.दुर्दैवी! उष्णतेने वैताग आल्याने ते रात्री हवेशीर छतावर झोपायला गेले, मात्र ती ठरली शेवटची रात्र
याबाबत वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही काहीही करू शकतो या आविर्भावात कोणत्याही राजकीय पक्षाने राहू नये… हे पुणेकर आहेत सकाळच्या नाष्ट्याला जेव्हा ते घरातून बाहेर पडतात तेव्हाच ठरवून बाहेर पडतात आज मिसळ बेडेकरांची खायची की श्री वाल्यांची, तेव्हा पुणेकरांचा जास्त नाद करू नका. नाहीतर या नदी सुधार प्रकल्पावरून ठरवतीलही की यावेळी मतदान कोणाला करायचे’. अशा पोस्टद्वारे वसंत मोरे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
पिंपरीत कोयता गँगचा धुडगूस! मेडिकल दुकानात पाण्याचे पैसै मागितले, केले धक्कादायक कृत्य